Uddhav Thackeray : ‘सच्चा समाजसेवकापुढे तुम्हाला झुकावचं लागलं…’ ठाकरेंचा शाहंना टोला

योगेश पांडे

महाविकास आघाडीची दुसरी वज्रमुठ सभा आज (रविवारी) नागपूरच्या दर्शन कॉलनी मैदानावर पार पडली

ADVERTISEMENT

(Shivsena (UBT) chief Uddhav Thackeray talk in Vajramuth rally in Nagpur on aappasaheb dharmadhikari
(Shivsena (UBT) chief Uddhav Thackeray talk in Vajramuth rally in Nagpur on aappasaheb dharmadhikari
social share
google news

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. ही एक आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. पण, हा पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात आला तर, जे देशभर घराणेशाहीच्या विरोधात बोंबलत आहेत. पण त्यांना एका समाजसेवा करणाऱ्या घरण्यासमोर झुकावं लागलं. त्यांच्याकडे काही सत्ता नाही, अधिकार नाही. पण सत्तेची मस्ती डोक्यात गेलेला कोणीही असला, तरी समोर सच्चा समाजसेवक असला, तर झुकावंच लागेल. हे महाराष्ट्राने संपूर्ण देशाला दाखवून दिलं आहे, असं म्हणतं शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना टोला लगावला. (Shivsena (UBT) chief Uddhav Thackeray talk in Vajramuth rally in Nagpur)

महाविकास आघाडीची दुसरी वज्रमुठ सभा आज (रविवारी) नागपूरच्या दर्शन कॉलनी मैदानावर पार पडली. यावेळी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे इतर नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

Karnataka : भाजपचं जहाज बुडणार? माजी मुख्यमंत्र्यांनी दिला सर्वात मोठा झटका

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, धर्माधिकारी घराणं मोठं आहे, या घराण्याची एक परंपरा आहे. ते व्यसनमुक्तीचेही काम करतात. दारू आणि अंमली पदार्थाचे व्यसन वाईट असते. तशीच सत्तेची नशा सुद्धा असते. दारूचे व्यसन एक घर उद्ध्वस्त करते. तर सत्तेची नशा पूर्ण देश उद्ध्वस्त करते, हे आपण भोगत आहोत.

शेतकऱ्यांचा आक्रोश सुरु असताना शिंदे अयोध्या दौऱ्यावर :

यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरही जोरदार टीका केली.  हे अवकाळी आणि उलट्या पायाचं सरकार आलं, सतत गारपीट होत आहे. हवालदिल शेतकरी ओरडत आहेत, शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. पण आमचे मुख्यमंत्री हे अयोध्येला देवदर्शनाला गेले. जा, पण हे राम राज्य महाराष्ट्रात कधी येणार? इकडे सरकारी अधिकारी पंचनाम्याला वेळेवर जात नाहीत, नंतर मुख्यमंत्री जातात अन् आदेश काय देतात, ताबडतोब पंचनामे करा. आम्ही सरकारमध्ये असताना वेळेत मदत पोहचत होती. आता शेतकरी काय बोलतात तर पंचनामे नका करू आमच्या मयताला या. हे निर्लज्ज आहेत, हे तिकडेही जातील.

हे वाचलं का?

    follow whatsapp