भाजप-शिवसेना युतीत ‘ठिणगी’! श्रीकांत शिंदे म्हणाले, “खासदारकीचा राजीनामा देतो”

मुंबई तक

रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित झालेल्या भाजपच्या बैठकीत शिवसेनेला सहकार्य न करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपच्या याच भूमिकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी थेट कल्याणच्या खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.

ADVERTISEMENT

kalyan lok sabha MP Shrikant shinde said i will resign from as mp if shiv sena or bjp asked me.
kalyan lok sabha MP Shrikant shinde said i will resign from as mp if shiv sena or bjp asked me.
social share
google news

Shrikant Shinde News : कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भाजप-शिवसेना युतीत पहिली ठिणगी पडल्याचे चित्र समोर आले आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित झालेल्या भाजपच्या बैठकीत शिवसेनेला सहकार्य न करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपच्या याच भूमिकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी थेट कल्याणच्या खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. (Eknath Shinde Politics in Thane)

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या बदलीवरुन भाजप आणि शिवसेनेत (शिंदे गट) जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. भाजप नेत्यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला की, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होत नाही, तोपर्यंत कल्याण लोकसभा मतदार संघात शिवसेनेला सहकार्य करायचे नाही. याच निर्णयामुळे कल्याणमध्ये भाजप-शिवसेनेत पहिली ठिणगी पडली आहे.

भाजपने घेतलेल्या निर्णयानंतर श्रीकांत शिंदे का झाले आक्रमक?

श्रीकांत शिंदे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून या निर्णयावर भूमिका मांडली आहे. श्रीकांत शिंदे भाजपच्या निर्णयावर म्हणाले की, “मी विधान ऐकलं. सोशल मीडियावर पाहिलं. मला वाटतं उमेदवार कोण, वरिष्ठ पातळीवर ते लोक नक्कीच ठरवतील. जो उमेदवार योग्य असेल, त्याला उमेदवारी देतील. पण, मला एवढेच सांगायचं आहे की, वेगळ्या विचाराने युती झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस असतील, यांनी एका विचाराने महाराष्ट्रात युती केली. महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. सरकारच्या माध्यमातून चांगलं काम होतं आहे. मला वाटतं कुठल्यातरी शुल्लक कारणावरून कुठल्यातरी वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई होत नाही, तोपर्यंत हे ठराव करतात की शिवसेनेला सहकार्य करायचं नाही. त्याचबरोबर कल्याण लोकसभेचा उमेदवार आम्हीच ठरवू, मला वाटतं ही आव्हानं खुप विचारपूर्वक दिली पाहिजे.”

हेही वाचा >> “2014 नंतर भाजपसोबत युतीला माझा विरोध होता”, संजय राऊतांचा ‘राजकीय बॉम्ब’

भाजपकडून दिल्या जाणाऱ्या आव्हानांवर श्रीकांत शिंदे म्हणाले, “आम्हाला आव्हानं देण्याचं काम या लोकांनी करू नये. या ठिकाणी शिंदे यांनी दहा महिन्यापूर्वी जे केलं, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली याचा विचार त्यांनी केला पाहिजे. जर हे पाऊल उचललं नसतं, तर काय परिणाम झाले असते, याचाही त्यांनी विचार केला पाहिजे. गेल्या 9 वर्षांपासून मला कल्याण लोकसभेतून मोठ्या मताधिक्याने जिंकून दिलं. तेव्हापासून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन जाण्यासाठी मी काम करतोय. आताच उल्हासनगरमध्ये 55 कोटी रुपये भाजपच्या नगरसेवकांना देण्याचं काम झालं. जीआर निघाला, त्याचे टेंडर निघतील. एवढं सगळं चांगलं काम सुरू असताना मला वाटतं कुणी शुल्लक कारणावरून युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये.”

हे वाचलं का?

    follow whatsapp