NCP: ...म्हणून 'तसाच' निकाल सुनावला, राष्ट्रवादी काँग्रेस निकालाबाबत राहुल नार्वेकर नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निर्णय देताना राहुल नार्वेकर काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निर्णय देताना राहुल नार्वेकर काय म्हणाले?
social share
google news

NCP Ajit Pawar and Rahul Narvekar: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सभापती राहुल नार्वेकर यांनी आज (15 फेब्रुवारी) आपला निर्णय दिला आहे. शरद पवार गटाला झटका देताना ते म्हणाले की, अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी आहे. अजित पवार यांच्याकडे 41 आमदारांचे निर्विवाद बहुमत आहे.' अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला निर्णय देताना केली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमकं काय म्हणाले? 

'विधानसभेतील बहुमताच्या जोरावर या प्रकरणाचा निर्णय होऊ शकत नाही, हा शरद पवार गटाचा युक्तिवाद फेटाळला जातोय. अजित पवार यांच्याकडे 41 आमदारांचे बहुमत आहे. हे निर्विवाद आहे. माझा विश्वास आहे की वास्तविक राजकीय पक्षाची व्याख्या बहुसंख्य विधिमंडळ पक्षाद्वारे केली जाऊ शकते. अजित पवार यांच्याकडे विधानसभेत बहुमत आहे. अजित पवार हाच खरा राजकीय पक्ष आहे असे मी मानतो.' असं महत्त्वपूर्ण विधान राहुल नार्वेकरांनि केलं आहे.

अजित पवारांच्या बाजूने निर्णय का गेला?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी निकाल दिला. गुरुवारी सायंकाळी त्यांनी आपल्या निर्णयात सर्व आमदारांना पात्र घोषित केले आणि अपात्रता प्रकरणातील सर्व याचिका रद्द केल्या. अजित पवार यांच्या गटाला खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचेही त्यांनी जाहीर केले. अजित पवार यांना 41 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सभापती म्हणाले. यामुळेच निर्णय हा अजित पवारांच्या बाजूने गेला आहे.

अपात्रतेच्या याचिका केल्या रद्द 

हा निकाल देताना अध्यक्षांनी अपात्रतेच्या याचिका फेटाळून लावल्या. त्यांनी सर्व आमदारांना पात्र ठरवलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

निर्णयापूर्वी अध्यक्ष राहुल नार्वेकर काय म्हणाले होते?

या निर्णयाबाबत अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, 'खरा राजकीय पक्ष कोण हे मला ठरवायचे आहे. यासोबतच दोन्ही गटांपैकी कोणता गट अपात्र आहे, हेही सांगावे लागेल. शिवसेना प्रकरण हे राष्ट्रवादीच्या बाबतीत एक उदाहरण आहे.' असे ते म्हणाले.

निवडणूक आयोगानेही अजित पवार गटालाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह सोपावलेलं!

यापूर्वी 6 फेब्रुवारीलाही निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा शरद पवारांना मोठा धक्का बसला होता. कारण निवडणूक आयोगानेही अजित यांच्या गटालाच खरी राष्ट्रवादी घोषित केली होती. सर्व पुरावे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते. अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे नाव आणि निवडणूक चिन्ह वापरण्याचा अधिकार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. मात्र, आयोगाने शरद पवार यांना नवीन पक्ष स्थापनेसाठी तीन नावे देण्यास सांगितले होते. त्यानुसार आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) असं नाव त्यांच्या गटाला मिळालं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT