‘राम मंदिर सोहळ्यानंतर काँग्रेस फुटणार, अन्…’, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
राम मंदिर सोहळ्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग येणार असून भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवण्यात येणार असल्याने काँग्रेस फुटणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT
Congress : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून धक्कातंत्राचे राजकारण घडत आहे. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. जानेवारी महिन्यात राम मंदिर (Ram Mandir) सोहळ्याआधी काँग्रेस फुटणार आणि याच महिन्यात ऑपरेशन लोटस (Operation Lotus) घडणार असल्याचे त्यांनी भाकीत केल्याने आता मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस फुटणार असल्याचा दावा करत ही घटना राम मंदिराच्या सोहळ्याआधी तरी घडेल किंवा नंतर तरी घडेल मात्र हे घडणार असल्याचे त्यांनी विश्वासाने सांगितले आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेस फुटणार
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बोलताना सांगितले की, आगामी काळात काँग्रेस फुटणार असल्यामुळे राज्यात आता सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षच राहणार नाही. त्यामुळे आता विरोधकांची भूमिका ही आम्हालाच पार पाडावी लागणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे. यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार निशाणा साधला आहे. कारण आता जी भाजप कधी काळी भ्रष्टाचाऱ्यांविरोधात लढत होती, त्याच भाजपमध्ये आता भ्रष्टाचारी नेते दिसत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हे ही वाचा >> आधी नग्न केलं, मग धावत्या ट्रेनमधून खाली फेकलं, थरारक घटनेत कसा वाचला महिलेचा जीव?
फडणवीसांनी नेते मोठे केले
अजंली दमानिया यांनी यावेळी भाजपवर निशाणा साधताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. राजकारणातून ज्या लोकांना बाजूला करायचे होते, त्याच लोकांना देवेंद्र फडणवीस मोठे करत आहेत. ज्यावेळी मी सिंचन घोटाळ्यावरून अजित पवार आणि एकनाथ खडसे यांच्याविरोधात लढत होते. त्यावेळी माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मी काम करत असल्याचा आरोप केला जात होता. त्याच प्रमाणे आताही मनोज जरांगे पाटील यांच्यामागेही एकनाथ शिंदे असल्याचा दावा काही जणांकडून केला जात आहे. मात्र त्यामध्ये काही ही तथ्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
हे वाचलं का?
हे स्वतःहूनच थांबवा
अंजली दमानिया यांनी फडणवीस आणि अजित पवारांवर टीका करत असताना त्यांनी जरांगे पाटील यांचे कौतुक करत त्यांनी त्यांच्यावर निशाणाही साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, ज्या मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी ज्या प्रकारे लढा उभा केला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक वाटते. मात्र जरांगे पाटील यांच्यावर आंदोलन करताना ज्या प्रकारे फुले उधळली जातात, ज्या प्रकारे 250 जेसीबीतून पुष्पवृष्टी केली जाते, त्या गोष्टी जरांगे पाटील यांनी स्वतःहूनच थांबवल्या पाहिजेत असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.
राजकारणात खळबळ
अंजली दमानिया यांनी एकाच वेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवरही जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाविषयी खंत व्यक्त करत कॉंग्रेस पक्ष फुटणार असल्याचे सांगितल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी शक्यता वर्तवली असली तरी राम मंदिराच्या सोहळ्यानंतर राज्याच्या राजकारणात नेमकं काय होणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Khadakwasla : ‘नानां’च्या उमेदवारीवरुन रुपाली चाकणकर स्पष्टच बोलल्या, ‘अनेक अभिनेते आले, पण…’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT