राष्ट्रवादीचे आमदार फुटणार? शरद पवारांचं सूचक विधान, राऊतांनी सांगितली स्टोरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

some ncp mlas may join to bjp, sharad pawar give hints, sanjay raut said in rokhthok
some ncp mlas may join to bjp, sharad pawar give hints, sanjay raut said in rokhthok
social share
google news

अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपसोबत जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू आहे. यावर राजकीय पक्षाचे नेते वेगवेगळ्या भूमिका मांडत असताना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करताना दिलेली माहिती सांगितली आहे. ठाकरेंसोबतच्या चर्चेत शरद पवारांनी याबद्दल सूचक विधान केलं आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्या नावाचा उल्लेख करत संजय राऊतांनी याबद्दल ‘रोखठोक’मध्ये लिहिलं आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालयातील निकाल लवकरच येणार असल्याची माहिती समोर आली. त्यापाठोपाठ चर्चा सुर झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार भाजपसोबत जाणार असल्याची. आता याबद्दलच संजय राऊतांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

संजय राऊत रोखठोक : “शिवसेना फोडली सीझन-1, आता राष्ट्रवादी फोडण्याचा सीझन-2”

संजय राऊतांनी रोखठोकमध्ये लिहिलं आहे की, “बिग बॉस, कौन बनेगा करोडपती अशा कार्यक्रमांचे ‘सीझन-1″, ‘सीझन- 2’ असे टीव्हीवर सुरूच असतात. तसे सीझन आता महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीबाबत सुरू आहेत. शिवसेना फोडली हा ‘सीझन-1’, आता राष्ट्रवादी फोडण्याचा ‘सीझन-2’ आला आहे, अशी चर्चा जोरात आहे. फोडाफोडी म्हणजेच लोकशाही हे आता काही लोकांनी ठरवूनच टाकले आहे. हिंदुस्थानी लोकशाहीची कशी धूळधाण उडवली जात आहे ते आता रोजच दिसते. कालपर्यंत लोकांची मते विकत घेतली जात होती. आता लोकांनी मते देऊन निवडून दिलेल्या आमदार-खासदारांना सहज विकत घेण्यास आजचे सत्ताधारी उतरले आहेत.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> अजित पवार नॉट रिचेबल असताना कुठे होते?, फडणवीसांनी खरं काय ते सांगूनच टाकलं!

“महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भविष्यात काय करतील? 15 आमदारांसह ते भाजपात सामील होतील असे अयोध्येत गेलेले शिंदे व भाजपचे आमदार छातीठोकपणे सांगत होते. या सगळ्यांवर परखड खुलासा अजित पवार यांनीच करायला हवा”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा ससेमिरा अजित पवार, त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे लागलाच आहे. त्यांच्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यांवर ईडीच्या धाडी पडल्या व कारखाना जप्त केला, पण आता यासंबंधात ईडीने जे आरोपपत्र दाखल केले त्यात पवार किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे नाव नाही. मग जरंडेश्वर खरेदीच्या व्यवहारातील मनी लॉण्डरिंगच्या आरोपांचे काय झाले? की ते सर्व आरोप आणि धाडी राजकीय दबावासाठीच होत्या? असे दहशत व दबावाचे राजकारण महाराष्ट्रात कधीच झाले नव्हते”, अशी टीकाही राऊतांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून केली आहे.

ADVERTISEMENT

शिंदेंनाही तुरूंगात जायचे नव्हते म्हणून… रोखठोकमध्ये काय?

संजय राऊतांनी रोखठोकमध्ये पुढे म्हटलं आहे की, “शिवसेनेचे 40 आमदार फोडून भाजपने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. हे अनैतिक आहे. त्यातले 16 जण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने अपात्र ठरतील म्हणून सत्ता वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तेवढेच आमदार ईडी, सीबीआयच्या मदतीने फोडायचे असे कारस्थान चालले आहे. ते 16 कोण? ज्यांच्यावर या ना त्या कारणाने खटले आहेत त्यांना धमकवायचे. हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबावर भाजपने हल्ले सुरू केले. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या व्यवहाराचे हे प्रकरण. मुश्रीफ यांनी जेरीस येऊन भाजपात जावे असा एकंदरीत खटाटोप आहे. मुश्रीफ हे शरद पवार यांचे विश्वासू, पण तुरुंगात कोणालाच जायचे नाही. एकनाथ शिंदे यांनाही तुरुंगात जायचे नव्हते. म्हणून त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला. ते सरळ बेइमानांचे सरदार झाले.”

ADVERTISEMENT

राष्ट्रवादीचे आमदार फुटणार? शरद पवार उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय म्हणाले?

“मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ‘पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रातील लोकांत सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे. जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील असे पवार-ठाकरे यांचे मत पडले”, असं संजय राऊतांनी भेटीबद्दल म्हटलं आहे. कुटुंबाला टार्गेट केले जात असल्याचा उल्लेख पवारांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा >> राष्ट्रवादी, काँग्रेसचे अनेक आमदार संपर्कात, पण…; फडणवीसांनी सांगितली प्रवेशाची वेळ

“ईडीच्या दहशतीने लोकांना फोडणे हे सभ्य लोकांचे राजकारण नाही. राजकारणात राहून लोकांनी अमाप संपत्ती कमावली. ती टिकविण्यासाठी त्यांना सत्तेची कवचकुंडले हवीच असतात. घाऊक पक्षांतरे त्यातून होतात. पवार यांनी एक चांगला मुद्दा मांडला, “आज जे भीतीने पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही भाजपात गेल्याने टेबलावरची फाईल कपाटात जाईल, पण या ईडी-सीबीआयच्या फाईली कधीच बंद होत नाहीत!” शिंद्यांबरोबर गेलेल्या 11 आमदार व 6 खासदारांच्या फायली सध्या टेबलावरून कपाटात गेल्या आहेत. शिंदे गटाप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अशा किती फायली कपाटात जातील ते पाहायचे”, असं भाष्य संजय राऊतांनी केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT