Sonia Gandhi या राज्यातून जाणार राज्यसभेवर जाणार; 14 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज भरणार
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यावेळी पहिल्यांदाच राज्यसभेला जाणार असून त्या 14 फेब्रुवारी रोजी राजस्थानमधून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी काँग्रेसमधून अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोनिया गांधी उद्या राज्यसभेसाठी अर्ज भरणार

Sonia Gandhi राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार

सोनिया गांधी पहिल्यांदाच जाणार राज्यसभेवर
Rajysabha Election : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यावेळी पहिल्यांदाच राज्यसभेला जाणार आहेत. राजस्थानमधून त्यांचे राज्यसभेवर जाण्याचे निश्चित झालं आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) बुधवारी 14 फेब्रुवारी रोजी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि मल्लिकार्जुन खर्गेही (Mallikarjun Kharge) उपस्थित राहणार आहेत.
राज्यसभेच्या 56 जागांवर निवडणूक
देशातील 15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 56 जागांवर निवडणुका होणार आहेत. त्याची 29 जानेवारी रोजी याबाबतची घोषणा करण्यात आली. तर यावेळी 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार असून यापैकी राजस्थानमधील तीन जागांवर सदस्य निवडले जाणार आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी प्रक्रियाही सुरू झाली आहे.
मनमोहन सिंह यांचा कार्यकाळ पूर्ण
माजी मुख्यमंत्री मनमोहन सिंह यांची राजस्थानमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, यावेळी त्यांनी नकार दिल्याने मनमोहन सिंह यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ही जागा रिक्त होणार आहे. काँग्रेसच्या या राखीव जागेवर निवडणुकीसाठी नवीन उमेदवार जाहीर करावा लागणार आहे. मात्र त्यासाठी सोनिया गांधी यांचे नाव सुचवण्यात आले आहे.
हे ही वाचा >> Balasaheb Thorat: 'चव्हाण भाजपात का गेले हे चौकातील सामान्य माणूसही सांगेल'
सोनिया गांधी पहिल्यांदाच राज्यसभेवर
ज्या 56 जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यापैकी 10 जागा काँग्रेससाठी राखीव आहे. म्हणजेच या जागांवर काँग्रेसचे उमेदवारही निवडून येणार हे निश्चित आहे. त्यामध्ये राजस्थानची एक जागाही येते. या जागेवरून सोनिया गांधी पहिल्यांदाच राज्यसभेवर जाणार असून सोनिया सध्या रायबरेली लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.