Sonia Gandhi PM Modi : सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींकडे मागितला अजेंडा, पत्रात 9 मुद्दे कोणते?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

The Modi government has called a special session of Parliament. Sonia Gandhi has also written a letter to PM Modi, in which the agenda of the special session has been asked.
The Modi government has called a special session of Parliament. Sonia Gandhi has also written a letter to PM Modi, in which the agenda of the special session has been asked.
social share
google news

Sonia Gandhi letter to PM Narendra Modi : मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे सत्र 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. मात्र, या अधिवेशनाचा अजेंडा काय आहे, याबाबत सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सरकारने हा अजेंडा उघड करावा, अशी मागणी विरोधक सातत्याने करत आहेत. सोनिया गांधी यांनी यासंदर्भात पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिले असून त्यात त्यांनी विशेष अधिवेशनाचा अजेंडा मागितला आहे.

विशेष अधिवेशनाच्या अजेंड्याबाबत विरोधकांना माहिती नाही, असे सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे. सहसा, विशेष अधिवेशनापूर्वी चर्चा होते आणि एकमत होते. त्याचा अजेंडाही अगोदर ठरवला जातो आणि एकमत घडवण्याचा प्रयत्न केला जातो. बैठक बोलावण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि त्यात अजेंडा ठरलेला नाही. एकमत घडवण्याचा प्रयत्नही झालेला नाही.

या विशेष अधिवेशनातील पाचही दिवस सरकारी कामकाजासाठी देण्यात आले आहेत, ही दुर्दैवी बाब असल्याचे सोनिया गांधींनी म्हटले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात नऊ मुद्दे उपस्थित केले आहेत.

हे वाचा >> Rupal ogre :संबंधास नकार दिल्याने…, एअर होस्टेस हत्याकांडात मोठा खुलासा

या नऊ मुद्द्यांवर विरोधकांना चर्चा करायची आहे, असे माजी काँग्रेस अध्यक्षांनी पत्रात म्हटले आहे. यामध्ये महागाई, एमएसएमई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मागण्या, अदाणी मुद्द्यावर जेपीसीची मागणी, जातिगणना, केंद्र-राज्य संबंध, चीन सीमा आणि सामाजिक सलोखा यांचा समावेश आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सोनिया गांधी यांनी मांडले 9 मुद्दे

1) जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, वाढती बेरोजगारी, वाढती असमानता आणि एमएसएमईचे संकट यावर लक्ष केंद्रित करणारी सद्य आर्थिक परिस्थिती
2) एमएसपीबाबत सरकारने शेतकरी आणि शेतकरी संघटनांना दिलेली आश्वासने
3) अदानी समूहावरील खुलाशांची चौकशी करण्यासाठी JPC चौकशी
4) मणिपूर हिंसाचार आणि राज्यातील घटनात्मक यंत्रणा आणि बिघडलेला सामाजिक सलोखा
5) हरियाणासारख्या राज्यात जातीय तणाव
6) चीनचा भारतीय भूभागावर सततचा ताबा आणि लडाख-अरुणाचल प्रदेशातील आपल्या सीमेवरील आपल्या सार्वभौमत्वाला आव्हान
७) जातीनिहाय जनगणना करणे गरजेचे
8) केंद्र-राज्य संबंध बिघडवण्याचे काम होत आहे
9) काही राज्यांमध्ये अतिप्रलय आणि काही राज्यात दुष्काळामुळे नैसर्गिक आपत्तीचे परिणाम

हे वाचा >> Mumbai : दोन सावत्र मुलांसह नवऱ्याचा बायकोवर सामूहिक बलात्कार,नंतर व्हिडिओ बनवून…

विशेष अधिवेशनावर विरोधक घालणार नाहीत बहिष्कार

आगामी विशेष अधिवेशनात विधायक सहकार्याच्या भावनेने हे मुद्दे मांडले जातील, अशी मला पूर्ण आशा आहे, असे सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, इंडिया आघाडीने निर्णय घेतला आहे की आम्ही संसदेच्या विशेष अधिवेशनावर बहिष्कार टाकणार नाही, कारण विरोधकांना आपले मुद्दे मांडण्याची ही संधी आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT