Sharad Pawar: ‘हे अत्यंत चिंताजनक…’, पवारांचं थेट अजितदादांनाच पत्र, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Even after the split in the NCP party, Sharad Pawar is trying to trouble Ajit Pawar through constructive questions. Sharad Pawar has written a letter directly to Ajit Pawar on one such issue.
Even after the split in the NCP party, Sharad Pawar is trying to trouble Ajit Pawar through constructive questions. Sharad Pawar has written a letter directly to Ajit Pawar on one such issue.
social share
google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) सध्या मोठी फूट पडली आहे. बहुसंख्य आमदारांसोबत अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपच्या (BJP) सोबत सत्तेत गेले आहेत. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री पदही स्वीकारलं आहे. त्यामुळे शरद पवारांनी (Sharad Pawar) स्थापन केलेल्या मूळ पक्षाच्या अस्तित्वाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मात्र, असं असलं तरी या सगळ्या गोष्टीचा अधिक बाऊ न करता शरद पवार यांनी विद्यमान सरकारला घेरण्याची संपूर्ण तयारी केली आहे. ज्यासाठी शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदेसह नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पत्र लिहलं आहे. (split ncp sharad pawar letter trouble ajit pawar through constructive questions government education political news headlines today)

ADVERTISEMENT

या पत्रात शरद पवार यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्थेवरुन राज्य सरकारचे कान टोचले आहेत. ‘केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१ – २२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स २.० ( पी जी आय) अहवालानुसार महाराष्ट्र राज्याची सातव्या स्थानावर घसरण झालेली दिसते. यापूर्वी आपले राज्य दुसऱ्या क्रमांकावर होते. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.’ असं म्हणत शरद पवारांनी थेट शिक्षणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालत सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे.

हे ही वाचा >> Crime : ‘या’ अ‍ॅपमुळे कुटुंबच संपलं! मुलांना दिलं विष अन् पत्नीसह घेतला गळफास

शरद पवार यांनी याबाबतच एक सविस्तर पत्रच लिहलं आहे. जे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रातून शरद पवारांनी आवर्जून अजित पवारांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात याबाबत बरीच चर्चा सुरू झाली आहे.

हे वाचलं का?

शरद पवारांचं ते पत्र जसंच्या तसं..

सक्षम शैक्षणिक व्यवस्था ही समाज सुधारण्यास कारणीभूत ठरत असते. महाराष्ट्रात अण्णाभाऊ साठेंसारख्या अनेक शिक्षणमहर्षींनी हेच तत्व ओळखून सक्षम शालेय व्यवस्था उभारण्याला प्राधान्य दिले. मात्र आजच्या काळात राज्यातील शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावला जाणे ही महाराष्ट्राच्या गुणवत्तादायी शैक्षणिक परंपरेला गालबोट लावणारी बाब आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स २.० (पी जी आय) अहवालानुसार महाराष्ट्र राज्याची दुसर्‍या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. राज्याच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासाच्या दृष्टीकोनातून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. ज्या निकषांच्या आधारे हे मूल्यमापन केले जाते त्यामध्ये अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता, पायाभूत सुविधा, बदलती शैक्षणिक प्रक्रिया आदी मुद्द्यांचा समावेश होतो. परंतु परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स २.0 (पी जी आय) अहवालानुसार महाराष्ट्रात या महत्वपूर्ण घटकांना गांभीर्याने घेतले गेल्याचे दिसून येत नाही.

या कारणास्तव राज्य म्हणून शैक्षणिक गुणवत्तेत खूपच मागे पडलो आहोत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाने, मागील वर्षी ‘दोन शिक्षकी शाळांचे सक्षमीकरण’या विषयावर एक दिवसाची परिषद घेऊन काही निरीक्षणे नोंदविली होती. यासोबतच बदलत्या शैक्षणिक धोरणांच्या दृष्टीकोनातून काही सूचना देखील केल्या होत्या. राज्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास ३८ हजार दोन शिक्षकी शाळा आहेत. त्या प्रामुख्याने वाड्या-वस्त्यांवर असून विद्यार्थी पट संख्या कमी असल्याने त्या बंद करण्याची चर्चा अधून-मधून होत असते, शासनाने त्याची गंभीर दाखल घेणे अतिशय गरजेचे आहे.

त्यामुळे खालावत जाणारा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी वेळीच उपाययोजना करायला हव्यात. या सर्व बाबींचा विचार करता राज्य शासन आणि विशेषतः शालेय शिक्षण मंत्रीमहोदयांनी याचा गांभीर्याने विचार करावा. याबाबत सर्व संबंधितांची लवकरात लवकर बैठक बोलावून आवश्यक कृती कार्यक्रम तयार करावा. शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत अग्रस्थानी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे.

हे ही वाचा >> रश्मी वहिनीसमोरच बोललो, फडणवीसांनी सांगितला ‘मातोश्री’तला प्रचंड इंटरेस्टिंग किस्सा

असं शरद पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे. आता या पत्राची दखल राज्य सरकार आणि विशेषत: अजित पवार कशा पद्धतीने घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवारांना राजकारणातून निवृत्त व्हा असा सल्ला दिला होता. ज्यावरुन त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. असं असतानाच शरद पवारांनी अजित पवारांना पाठविलेल्या या पत्राचा नेमका अर्थ काय? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT