Supriya Sule : 'मोदी आणि आम्ही एकच आहोत', सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

 'अजित पवारांनी जे केले, तेच असंख्य कार्यकर्त्यांनी देखील केले. राहुल कुल माझ्यासाठी अनेकदा पडले. पण या सगळ्यांनी जे जे केले ते मी कधीच विसरले नाही आणि विसरणार नाही', असे सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांनी सांगितले आहे.
supriya sule big statement on narendra modi bjp ncp sharadchandra pawar ajit pawar sunetra pawar ncp politics maharashtra politics
social share
google news

Supriya Sule Big Statement On Narendra Modi : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अजित पवारांनी बारामतीतून निवडून आणल्याचा दावा अजित पवार (Ajit Pawar) गटाकडुन नेहमीच करण्यात येतो आहे. या दाव्यावर आता सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. 'अजित पवारांनी जे केले, तेच असंख्य कार्यकर्त्यांनी देखील केले. राहुल कुल माझ्यासाठी अनेकदा पडले. पण या सगळ्यांनी जे जे केले ते मी कधीच विसरले नाही आणि विसरणार नाही', असे सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांनी सांगितले आहे.  (supriya sule big statement on narendra modi bjp ncp sharadchandra pawar ajit pawar sunetra pawar ncp politics maharashtra politics) 

ADVERTISEMENT

सुप्रिया सुळे या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. या कार्यक्रमात अजित पवारांनी बेस्ट पार्लमेंट अवॉर्ड मिळवून निवडणूक जिंकता येत नाही? अशी टीका सुप्रिया सुळेंवर केली होती. या टीकेवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, याचं उत्तर...राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु यांनी दुसऱ्या दिवशी जो सत्कार केला त्यामध्येच होतं. 

हे ही वाचा : 'गुवाहाटीत एअर होस्टेसचा विनयभंग कोणी केला?', असीम सरोदेंचा शिंदे गटावर आरोप

''लोकशाहीमध्ये लोकतंत्राच सगळ्यात मोठं मंदिर काय आहे, तर ती आहे संसद. या बाबतीत मोदी जी आणि आम्ही एकच आहोत. आमचे कितीही राजकीय मतभेद असले तरी, मोदीजी जेव्हा पहिल्यांदा निवडून आले, पहिल्या दिवशी त्या पहिल्या पायरीवर नतमस्तक झाले. त्यामुळे 800 खासदार आम्ही जे जातो, त्यातले बरेचशे आमदार आम्ही कायम असतो. आम्ही 25 ते 30 खासदार आहोत, जे कायम तिकडे असतो, प्रत्येक समित्यांमध्ये आम्ही सक्रिय असतो'', असे सुप्रिया सुळे सांगतात. 

हे वाचलं का?

अजित दादांनी माझ्यासाठी कष्ट केलेत का? ''हो अर्थातच केले आहेत. त्यात गैर काय? जसे दादांनी केले आहेत, तसे असंख्य कार्यकर्त्यांनी केले. राहुल कुल माझ्यासाठी अनेकदा पडले. मागच्या वेळेस राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल आणि मी एकमेकांच्या विरोधात लढलो होतो. हर्षवर्धन भाऊ, भरणे मामा आम्ही एका विचाराने काम करत नाही. पण या सगळ्यांनी जे केले आहे,हे मी कधीच विसरले नाही आणि विसरणार नाही, असे सुप्रिया सुळे स्पष्ट सांगितलं. 

हे ही वाचा : "...आपणाला कधीच माफ करणार नाही", आंबेडकरांना आव्हाडांचं पत्र

दरम्यान लोकसभा निवडणुकीत पराभव होण्याची भीती वाटते आहे का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी फक्त माझ्या आईला घाबरते, बाकी कुणालाच घाबरत नाही. आणि कुटुंबाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही, असे म्हणत अजित पवारांना कुटुंबाने एकट पाडल्याची चर्चा फेटाळून लावली. 

ADVERTISEMENT

सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,  ''तो त्यांच्या गठबंधनाचा वैयक्तिक प्रश्न आहे. याबाबत मी कसे सांगणार. मी लोकशाहीवर प्रेम करणारी आणि विश्वास ठेवणारी एक आहे. त्यामुळे माझ्याविरोधात लोकशाहीमध्ये कोणीतरी लढलेच पाहिजे. माझी लढाई ही वैयक्तिक नसून वैचारीक लढाई आहे'', असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT