Jitendra Awhad : "...आपणाला कधीच माफ करणार नाही", आंबेडकरांना आव्हाडांचं पत्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकरांना काय म्हटलं आहे?
Jitendra awhad apeal to prakash ambedkar
social share
google news

Jitendra Awhad Prakash Ambedkar : महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात अजूनही मनोमिलन झालेलं नाही. आम्ही अजूनही महाविकास आघाडीच्या बाहेर आहोत, असे प्रकाश आंबेडकर सांगत आहेत. त्यांच्या मनधरणीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रप्रपंच केला आहे. 

जितेंद्र आव्हाड यांचं आंबेडकरांना पत्र... वाचा जसंच्या तसं

"मा. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर (राष्ट्रीय अध्यक्ष,वंचित बहुजन आघाडी)  आपणांस सविनय जयभीम !
मी शिव, फुले, शाहू , आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार-प्रसार व्हावा आणि जनमाणसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम, आपुलकी, माया निर्माण व्हावी, यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो.

हेही वाचा >> भाजप खासदाराचा महिलेसोबतचा कथित व्हिडीओ व्हायरल 

मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार या पक्षाचा कार्यकर्ता असलो, तरी माझ्या काही वैयक्तिक भूमिका आहेत. महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा जोपासणारे अनेक नेते आहेत. त्यातील महत्वाचे नेते म्हणून प्रकाश आंबेडकर म्हणजेच आपणांकडे पाहिले जात आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आपणांकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे. या वारसाचा पूर्ण सन्मान ठेवून मी त्यांना एकच विनंती करू इच्छितो की, तुमचे ध्येय आणि आमचे ध्येय एकच आहे, ते म्हणजे संविधान वाचविणे आणि देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहिल, यासाठी प्रयत्न करणे; अन् त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तरी तयार आहे.

Jitendra Awhad letter to prakash ambedkar
जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहून महाविकास आघाडीसोबत येण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा >> 'शिवसेनेचे खासदार न येता फक्त भाजपचेच आले पाहिजे', कदम संतापले

आपणही याच विचारांचे आहात. संविधान आणि लोकशाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले अमूल्य धन आहे. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल, यासाठी आपण प्रयत्न करूया ! 
जय हिंद, जय महाराष्ट्र,  जय भीम

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT