OBC नोंद असलेला शरद पवारांचा दाखला व्हायरल, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Supriya sule on Sharad Pawar viral Certificate : सोशल मीडियावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा ओबीसी असल्याचा दाखला व्हायरल होत आहे. या दाखल्यात शरद पवार यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा दावा केला जात आहे. यावर शरद पवार समर्थक विकास पासलकर यांनी संबंधित जातीचा दाखला खोटा असल्याचा दावा केलाय. यावर आता शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे (Supriya sule)  यांनी देखील हा दाखला खोटा असल्याचे म्हटले आहे.(supriya sule reaction on sharad pawar viral obc certificate fake leaving certificate maharashtra politics)

प्रसिद्धी माध्यमांनी सुप्रिया सुळे यांना शरद पवारांच्या व्हायरल दाखल्याचा प्रश्न विचारला होता. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, जो दाखल दाखवला जातोय तो इंग्लिशमध्ये आहे. पवारसाहेब ज्यावेळी शाळेत होते तेव्हा इंग्लिश असू शकते का? असा प्रतिसवाल सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना केला. हे सगळे हास्यास्पद असून हा बालिशपणा सुरू आहे. खोटी सर्टिफिकेट आजकाल मार्केटमध्ये मोठी गोष्ट झाली आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी देखील दाखला खोटा असल्याचा दावा केला.

हे ही वाचा : Crime : संतापलेल्या पतीने डोक्यात प्रेशर कुकर घातला, पत्नीचा जागीच गेला जीव

सुप्रिया सुळे यांनी यावेळी शऱद पवारांच्या प्रकृतीचीही माहिती दिली. शरद पवारांना डॉक्टरांनी सांगितले आहे की घरी लोकांना भेटू शकता. पण प्रवास टाळावा. त्यामुळे आज, उद्या, परवा ते घरी सगळ्यांना घरी भेटणार आहेत फक्त प्रवास करणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शरद पवारांचा ओबीसी उल्लेख असलेला दाखला जाणून बुजून संघ आणि भाजप वायरल करीत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केलेला आहे. शरद पवारांचा मराठा असा उल्लेख असलेला दाखला संभाजी ब्रिगेडने पुढे आणला आहे. शाळेतील दाखल्यावर मराठा असा उल्लेख असताना काही जण जाणून बुजून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शरद पवारांच्या शाळेच्या दाखल्यावर ओबीसीचा उल्लेख असलेला दाखला व्हायरल केला जातोय. जे जिजाऊचे वंशज सांगतात त्यांनी हे केलं आहे. ओबीसी आणि मराठा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असे संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर यांनी आरोप केला आहे.

हे ही वाचा : Video : अफगाणिस्तानच्या खेळाडूने दाखवला मनाचा मोठेपणा, गरिबांची दिवाळी केली गोड

    follow whatsapp

    ADVERTISEMENT