Nanded : ‘कुणाची तरी मुलं मेली, हे खोके सरकार…’, सुप्रिया सुळेंना राग अनावर
Supriya Sule visit Nanded Hospital : माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. कुणाची तरी मुलं मेली आहेत…इतंक असंवेदनशील होऊ नका. त्या आईचं दु:ख बघा..त्या मातांना भेटा असा संताप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे नांदेड मृत्यू प्रकरणावर व्यक्त केला.
ADVERTISEMENT
Supriya Sule visit Nanded Hospital Death Case : माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. कुणाची तरी मुलं मेली आहेत…इतंक असंवेदनशील होऊ नका. त्या आईचं दु:ख बघा..त्या मातांना भेटा असा संताप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे नांदेड मृत्यू प्रकरणावर व्यक्त केला. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाला भेट देऊन घटनेचा आढावा घेतला. या आढाव्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परीषद घेऊन सरकारवर टीका केली. (Supriya sule visit nanded hospital death case criticize shinde government)
ADVERTISEMENT
नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेत आजपर्यंत तब्बल 37 रूग्णांचा मृत्यू झालाय, यामध्ये 22 नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेवरून सुप्रिया सुळे चांगल्याच भडकल्या आहेत.
हे ही वाचा : Nallasopara : ‘डॉन को पकडना…’, अमिताभ बच्चनचा डायलॉग मारला अन् पोलिसांनी मुसक्या आवळल्या, नेमकं काय घडलं?
नांदेडच्या घटनेत कुणाची तरी मुलं मेली आहेत. त्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, इतंक असंवेदनशील होऊ नका. त्या आईंचं दु:ख बघा, त्या मातांना भेटून या जरा, त्यांचं काय दु:ख आहे ते एकदा जाणून घ्या,अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. या घटनेची कुणी तरी जबाबदारी घेतली पाहिजे. खोके सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेऊन, घटनेतील जबाबदार व्यक्तीकडून राजीनामा घेतला पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
हे वाचलं का?
खरं तर या घटनेला राज्याचे मंत्रिमंडळच जबाबदार आहे असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच या खात्याच्या मंत्र्याने स्वत:हून राजीनामा दिला पाहिजे होता. इतकी जण मेली आहेत, मग या मत्र्यांना झोपा कशा लागतात? यांच्यापर्यंत आईचं दु:ख पोहोचत नाही का? निर्लंज्जपणा आहे हा, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केली.
हे ही वाचा : Sonam Rai-Khan: ‘मी बिकिनी मॉम बनण्यास तयार, सेक्सी म्हणणं..’, अभिनेत्रीची बेधडक मुलाखत
नांदेडमध्ये लोक दगावताय, याचं काही सरकारला पडलं नाही आहे. यांना पालकमंत्री पदात जास्त रस आहे. त्यामुळे खोके सरकार असंवेदनशील असून यांचं मंत्रिमंडळ अकार्यक्षम असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी महायुतीवर केली. तसेच 200 आमदारांचं हे सरकार आहे, फक्त ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पक्ष फोडा, कुटुंब फोडा या गोष्टीत हे व्यस्त आहेत. त्यांना प्रशासनाचं काही राहिले नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
ADVERTISEMENT
हेमंत पाटलांचा जाहीर निषेध
दरम्यान नांदेडमधील मृत्यू प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी रूग्णालयातील अस्वच्छता पाहून डीनलाच स्वच्छतागृह साफ करायला लावलं होतं. या प्रकरणावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. खासदार हेमंत पाटलांनी जी कृती केली ती महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी होती. एका डॉक्टरला तुम्ही असं वागवता. त्यामुळे हे चुकीचे याचा मी जाहीर निषेध करते, अशा सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT