‘राहुल नार्वेकरांसारखे पाताळयंत्री…’, सुषमा अंधारेंनी PM मोदींवरही चढवला हल्ला

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

sushma andhare criticize pm narendra modi and rahul narvekar thackeray group nashik adhiveshan maharashtra politics
sushma andhare criticize pm narendra modi and rahul narvekar thackeray group nashik adhiveshan maharashtra politics
social share
google news

Sushma Andhare criticize pm narendra modi : ‘रामायणात प्रभू श्रीराम हे एकवचनी आहेत, पण काल ज्यांनी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करून प्रचाराचा टूलकिट केला त्यांना मुळात एकवचनी कळालेच नाही’, अशा शब्दात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. तसेच राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांचा उल्लेख पाताळयंत्री असा करत, आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला. (sushma andhare criticize pm narendra modi and rahul narvekar thackeray group nashik adhiveshan maharashtra politics)

ADVERTISEMENT

ठाकरे गटाचा नाशिकमध्ये राज्यव्यापी महाअधिवेशन सुरु आहे. या महाअधिवेशनातून सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. काही नेते काल तूरू तूरू चालत होते आणि पत्नी वनवासात, पण उद्धव ठाकरे यांनी वहिनींचा आदर केला आहे, असे उद्गगार सुषमा अंधारे यांनी काढत पंतप्रधान मोदींवर टीका केली.

हे ही वाचा : Ram Mandir : कपाळी टिळा, रत्नजडित दागिने… रामलल्लाच्या अलौकिक श्रृंगाराचे वैशिष्ट्य काय?

रामायणात प्रभू श्रीराम एकवचनी होते. पण यांचा नेता 72 तासाच्या आत विसरतो 70 हजार कोटी घोटाळ्याचा आरोप कुणावर केला आणि त्यांनाच पुन्हा पक्षात घेतो, कसले हे एकवचनी?, असा हल्ला देखील सुषमा अंधारे यांनी मोदींवर चढवला. तसेच आमचे देवाभाऊ स्वत:ला एकवचनी म्हणतात, राष्ट्रवादीशी यूती नाही नाही. आणि पहाटे दुपारी दोन-दोन जाऊन लव्ह मॅरेज करतात, असा टोला सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना लगावला.

हे वाचलं का?

सुषमा अंधारे पुढे म्हणाले, एकवचनी असण्याची व्याख्या काय असावी. ही गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते, प्रभू श्रीरामाचे टूलकिट ज्यांनी केले, त्यांना विसर पडला, तुम्ही श्रीराम आणले, असं किती म्हणालात, तरी तुम्ही राम राज्य आणू शकणार आहात का? असा सवाल देखील अंधारे यांनी उपस्थित केला.

देशात रात्रीचे 12 सोडा दिवसा 12 वाजताही एखादी स्त्री सुरक्षित वावरू शकत नाही. पण आपल्यालाच कसा महिला शक्तीचा पुळका आहे, असे सागणाऱ्या लोकांना याचा विसर पडतो. या देशाच्या प्रथम नागरीक राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू जी यांना ना संसदेच्या उद्घाटनात बोलवतात, ना राम मंदिर सोहळ्याला, म्हणजेच महिलांचा सन्मान कसा पायदळी तुडवला जातो, महिला खेळाडू किंवा हाथरस, कठूआच्या महिला असतील. एकालाही यांनी न्याय दिला नाही, अशी टीका अंधारे यांनी पंतप्रधान मोदींवर केली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : PM मोदींचे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन; म्हणाले, “त्यांच्या नेतृत्वामुळे…”

राहुल नार्वेकरांसारखे पाताळयंत्री लोक, जोपर्यंत कपटनीतीने फासे टाकतात.तोपर्यंत कौरव पक्षात सामील झालेली गद्दार गॅग, किंवा सगळे भ्रष्टाचारी असतील यांना असे वाटतेय, फासे आपल्या बाजूने पडतील, पण महाभारतात कुरूक्षेत्रावर जेव्हा युद्ध सुरु झाले, तेव्हा अंतिम विजय संख्येने कमी असणाऱ्या पांडवांचा झाला होता. तो अंतिम विजय आमच्या बाजूने असेल, असा विश्वास देखील सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT