Karnataka : भाजपचं जहाज बुडणार? माजी मुख्यमंत्र्यांनी दिला सर्वात मोठा झटका
कर्नाटकमध्ये माजी मुख्यमंत्री आणि लिंगायत समाजाचे बडे नेते जगदीश शेट्टर यांचा भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश
ADVERTISEMENT
बंगळुरु : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला (BJP) आणखी एक मोठा झटका बसला आहे. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटकमधील लिंगायत समाजाचे बडे नेते जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) यांनी काँग्रेसच्या (Congress) ‘हाताला’ साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी रविवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. उत्तर कन्नड जिल्ह्यातील सिरसी येथे त्यांनी विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यंदाच्या निवडणुकीत शेट्टर यांना भाजपने तिकीट नाकारले होते. त्याच दरम्यान, काँग्रेसने शेट्टर यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते. (Jagdish Shettar, the former chief minister of Karnataka and a big leader of the Lingayat community in Karnataka, left the BJP and joined the Congress)
ADVERTISEMENT
शेट्टर यांची समजूत काढण्यात भाजप नेत्यांना अपयश :
कर्नाटकचे भाजपचे निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शेट्टर यांची समजूत काढण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. हुबळी-धारवाडचे आमदार असलेले जगदीश शेट्टर हे लिंगायत समाजाचे मोठे नेते मानले जातात. त्यांनी मुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली आहे. याशिवाय तब्बल 6 वेळा आमदार राहिले आहेत.
शेट्टर यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, भाजपसोबतचा 3 दशकांचा प्रवास संपवून मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे. यावेळी त्यांनी आपण निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील म्हणाले की, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पक्षात ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना कटील म्हणाले की, यावेळी त्यांना उमेदवारी न देण्याच्या पक्षाच्या निर्णयामागे कोणतेही षडयंत्र नव्हते.
हे वाचलं का?
शेट्टर यांच्यासाठी काँग्रेसच्या पायघड्या :
दरम्यान, शेट्टर यांच्यासाठी काँग्रेसने पायघड्या टाकल्याच दिसून आलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बीके हरिप्रसाद म्हणाले की, शेट्टर यांना काँग्रेसमध्ये जायचे असेल तर त्यांचा पक्ष त्यांचे स्वागत करेल. ‘प्रामाणिक मुख्यमंत्री’ असं शेट्टर यांचं वर्णन करत हरिप्रसाद म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर कोणतेही आरोप नव्हते. दुसरीकडे, एम.बी.पाटील, सिद्धरामय्या, डीके शामनूर हे तीन बडे नेते शेट्टर यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यांना बंगळुरूहून आणण्यासाठी विशेष विमानही सज्ज ठेवण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT