Shiv Sena: ‘Video गेम खेळून आमदार झालेल्यांनी मुख्यमंत्र्यांना…’, आदित्य ठाकरेंवर जहरी टीका
Manisha Kayande Criticized to Aaditya Thackeray: Video गेम खेळून आमदार झालेल्यांनी मुख्यमंत्र्यांना शिकवू नये. अशा शब्दात मनीषा कायंदे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
Politics News Maharashtra: मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडापासून शिवसेना (ShivSena UBT) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे सातत्याने शिंदे सरकारवर आणि विशेषत: 40 बंडखोर आमदारांवर हल्ला चढवत आहेत. तसेच अत्यंत गंभीर असे आरोपही ते करत आहेत. शिंदेंचं सरकार हे घटनाबाह्य आहे, गद्दार आणि गँगस्टर यांचं हे सरकार आहे. अशी टीका आदित्य ठाकरे वारंवार करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, आता त्यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. (those who have become mla by playing video games should not teach the cm manisha kayande venomous criticism on aaditya thackeray)
ADVERTISEMENT
शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘वरळीतून निवडून येण्यासाठी एका आमदाराला घरी बसवलं, तर एका दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला विधान परिषदेवर आमदार केलं. या उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरसेवकांपासून काम करत पुढे आले आहेत. केवळ व्हिडिओ गेम खेळत मुख्यमंत्री झाले नाहीत.’ अशा म्हणत मनिषा कायंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.
मनिषा कायंदे नेमकं काय म्हणाल्या?
‘आदित्य ठाकरे हे म्हणतात की, महाराष्ट्रातील सरकार हे गद्दारांचं आणि गँगस्टरांचं आहे. पण आदित्य ठाकरे आपण विसरलात की, वरळीतून निवडून येण्यासाठी तुम्ही एका विद्यमान आमदाराला घरी बसवलं. दुसऱ्या एका विरोधकाला तुम्ही पक्षात घेऊन त्यांना विधानपरिषद दिली. अशा पद्धतीने आपली सीट सेफ केलीत.’
हे वाचलं का?
हे ही वाचा>> ब्रिटनमधील गणेशोत्सव पोलिसांनी रोखला, व्हिडीओ व्हायरल
‘याउलट माननीय एकनाथ शिंदे हे नगरसेवकपासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत अक्षरश: त्यांनी मेहनत केली, घाम गाळला.. केवळ व्हिडीओ गेम खेळता-खेळता ते मुख्यमंत्री झालेले नाहीत. एवढं आपण लक्षात ठेवावं. त्यामुळे अशी बालिश विधानं करू नयेत.’ अशा शब्दात मनिषा कायंदे यांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Shiv Sena MLAs case : शिंदे अपात्र झाल्यास भाजपचा प्लॅन बी काय? समजून घ्या 4 मुद्द्यांत
काही महिन्यांपूर्वीच मनिषा कायंदेंनी सोडलेली उद्धव ठाकरेंची साथ
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच मनिषा कायंदे या शिवसेना (UBT) मधून शिवसेना पक्षात आल्या आहेत. याआधी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने मनिषा कायंदे यांना विधान परिषदवर निवडून आणलं होतं. मात्र, शिंदेच्या बंडखोरीनंतर पक्षात आलेल्या सुषमा अंधारेंमुळे महिला आमदार आणि नेत्यांमध्ये काहीशी धुसफूस सुरू झाली होती. त्यापैकी सर्वात नाराज असणाऱ्यांमध्ये मनिषा कायंदे याच होत्या. त्यामुळे त्यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर आता त्या थेट ठाकरे कुटुंबीयांवर हल्ला चढवत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT