धक्कादायक : समोर विधानसभा चालू अन् भाजपचे आमदार महोदय पॉर्न पाहण्यात व्यस्त

मुंबई तक

ADVERTISEMENT

Tripura BJP MLA Jadab Lal Nath caught watching porn in assembly
Tripura BJP MLA Jadab Lal Nath caught watching porn in assembly
social share
google news

Tripura BJP MLA Jadab Lal Nath :

ADVERTISEMENT

त्रिपुरातील बागबासा मतदारसंघातील भाजप आमदार जादब लाल नाथ (Jadab Lal Nath) सध्या देशभरात चर्चेत आहेत. जादब लाल नाथ (Jadab Lal Nath) भर विधानसभेत पॉर्न व्हिडिओ पाहताना कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. इंडिया टुडे नॉर्थ ईस्टच्या वृत्तानुसार, त्रिपुरा (Tripura) विधानसभेत जादब लाल नाथ त्यांच्या टॅबलेटवर पॉर्न पाहत होते. याचवेळी मागून कोणीतरी त्यांचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विधानसभेशी संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 27 मार्च रोजी घडली आहे. (Tripura BJP MLA Jadab Lal Nath caught watching porn in assembly)

कोण आहेत जादब लाल नाथ?

जादब लाल नाथ, यापूर्वी एक सीपीआय(एम) पक्षाचे कार्यकर्ता होते. 2018 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी जादब यांनी CPI(M) उमेदवार आणि माजी सभापती रामेंद्र चंद्र देबनाथ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, परंतु यात त्यांचा पराभव झाला. नुकत्याच झालेल्या 2023 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा भाजपकडून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.

हे वाचलं का?

हेही वाचा : Chhatrapati Sambhajinagar राड्याचे 6 CCTV फुटेज समोर; कोण आहेत दंगेखोर?

यावर भाजपने काय म्हटले?

या संपूर्ण प्रकरणाबाबत त्रिपुरा भाजप अध्यक्ष राजीव भट्टाचार्य म्हणाले, ‘आम्हाला काल रात्री मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणाची माहिती मिळाली. रात्री जादब लाल नाथ यांच्याशीही माझे बोलणे झाले. मी त्यांना आज फोन केला आहे. त्यांना पक्षाच्या वतीने नोटीसही बजावण्यात येणार आहे. आम्ही त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागणार आहोत. एका षड्यंत्राखाली हा प्रकार घडल्याचे आमदार जादब लाल यांचे म्हणणे आहे. आता त्यावर ते पक्षाला स्पष्टीकरण देतील.

हेही वाचा : विकृत नवरा.. बायकोचे बेडरुममधील प्रायव्हेट व्हिडीओ केले शेअर, कारण…

कर्नाटकात भाजपचे मंत्री पॉर्न पाहत होते :

दरम्यान, असाच एक प्रकार 2012 साली कर्नाटक विधानसभेत समोर आला होता. विधानसभेच्या कामकाजादरम्यान कर्नाटक सरकारचे 2 मंत्री मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहताना आढळले होते. विधानसभेच्या कामकाजादरम्यान तत्कालीन सहकार मंत्री लक्ष्मण सवदी आणि महिला व बालकल्याण मंत्री सी.सी.पाटील मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहत होते.

ADVERTISEMENT

लक्ष्मण सवदी आणि सीसी पाटील यांचे हे कृत्य विधानसभेचे कामकाज कव्हर करणाऱ्या एका स्थानिक वाहिनीच्या कॅमेऱ्याने टिपले. दोन्ही मंत्री अश्‍लील व्हिडिओ पाहत असताना विधानसभेत चर्चा सुरू होती. पण, दोन्ही मंत्री चर्चा सोडून अश्‍लील व्हिडिओ पाहण्यात व्यस्त दिसले. कर्नाटकात ही बाब समोर आल्यानंतर तत्कालीन भाजप सरकारला मोठ्या टीकेचा सामना सहन करावा लागला होता. विरोधकांनी यावर जोरदार निशाणा साधला होते. जनता दल सेक्युलर (जेडीएस) नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी या घटनेला लोकशाहीवरील काळा डाग म्हटलं होतं.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Tamil Nadu: किरकोळ कारणावरून 9वर्षीय इन्स्टा क्वीनची गळफास लावून आत्महत्या

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT