Uddhav Thackeray: मविआने रणशिंग फुकलं! ठाकरेंचा मित्रपक्षांनाच क्लिअर 'मेसेज'
Uddhav Thackeray Latest News: महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मविआचा पहिला मेळावा मुंबईत पार पडला. यावेळी ठाकरेंनी मित्रपक्षाना क्लिअर मेसेज दिला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
उद्धव ठाकरे मविआच्या मेळाव्यात काय बोलले?
जागावाटपाबद्दल काय दिला मेसेज?
मुख्यमंत्रिपदाबद्दल ठाकरेंना का बोलावं लागलं?
Uddhav Thackeray News Marathi: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लांबणीवर केल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑक्टोबर ऐवजी नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होण्याचा अंदाज आहे. पण, राज्यात राजकीय वातावरण तापू लागलं आहे. महाविकास आघाडीनेही शुक्रवारी (१६ ऑगस्ट) प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. मविआच्या पहिल्याच मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना स्पष्ट मेसेज दिला. ठाकरे नेमके काय म्हणाले? ()
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केलेले भाषण महायुतीवर टीका करण्यापेक्षा मविआसाठीच्या 'मेसेज'मुळेच जास्त चर्चेचा विषय ठरले. उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांवर अप्रत्यक्षपणे बोट ठेवत मित्रपक्षांसमोर स्पष्ट भूमिका केली. ठाकरे काय म्हणाले ते आधी वाचा...
महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ठाकरे 'मविआ'बद्दल काय बोलले?
उद्धव ठाकरे म्हणाले, "अशी जिद्द पाहिजे की, एकतर तू राहशील किंवा मी राहीन. या जिद्दीने लढाई लढली पाहिजे. फक्त तू राहशील किंवा मी राहीन हे आपल्या तिघांत वा आपल्या मित्रपक्षात नको. नाहीतर काँग्रेस राष्ट्रवादीला बोलते, राष्ट्रवादी आम्हाला बोलते, आम्ही आणखी कुणाला बोलतो."
हे वाचलं का?
"आपल्यात काड्या घालणारी लोक युतीमध्ये बसली आहेत. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार की आणखी कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की, पृथ्वीराजजी, पवारजी तुम्ही आता तुमच्यापैकी कुणीही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल."
हेही वाचा >> 'या' तीन कारणांमुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लांबणीवर
"पुढचा धोका सांगतो. जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतला आहे. त्या अनुभवाची पुनरावृत्ती मला नकोय. आम्ही २५-३० वर्ष सेना-भाजप युती. मग जागावाटप व्हायचे. मग अशाच बैठका व्हायच्या. त्या बैठकांमध्ये जाहीर केले जायचं की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री. हेच धोरण आम्ही एकमेकांच्या पायावर धोंडे पाडण्यात टाकायचो."
ADVERTISEMENT
"तुझ्या जास्त जागा आल्या, तर तुझा मुख्यमंत्री होईल. मग तुझी जागा मी पाडणार, माझी जागा तू पाडणार; मग आपली जागा तो पाडणार. पाडापाडीच्या राजकारणात युतीला काय महत्त्व राहिले? ज्याच्या जागा जास्त होतील... नाही, आधी ठरवा आणि चला पुढे. माझी त्याला काही हरकत नाही. ठरवा आधी. पण, या धोरणाने जाऊ नका."
ADVERTISEMENT
हेही वाचा >> "महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल, तर..."; मविआच्या मेळाव्यात शरद पवारांचं सूचक विधान
"नाना, मघाशी तुम्ही नव्हता, मी बोललो. मुख्यमंत्री कोण होणार? काँग्रेसने आज चेहरा जाहीर करावा. पवारांनी करावा, मी त्याला सगळ्यांच्यासमोर पाठिंबा द्यायला तयार आहे. फक्त जागेवरून मारामाऱ्या करू नका. एखादी जागा जागावाटपात काँग्रेसकडे गेली. काँग्रेसकडे गेली म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीने काम करायचं नाही, असे करायचे नाही. शिवसेनेकडे आली राष्ट्रवादी आणि शिवसेनेने काम करायचं नाही, असे नाही. राष्ट्रवादीला दिली तरी सगळ्यांनी काम केले पाहिजे. एकजूट... वज्रमूठ फक्त शब्दात असता कामा नये. वज्रमूठ ही कामातून दिसली पाहिजे", असे ठाकरे म्हणाले.
ठाकरेंनी महाविकास आघाडीला काय दिला मेसेज?
उद्धव ठाकरेंनी दोन गोष्टी मेळाव्यात बोलताना अधोरेखित केल्या. त्यावर जास्त जोर दिला. पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्रिपदाबद्दलचा संभ्रम! दिल्ली दौऱ्यापासून उद्धव ठाकरे मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, अशी चर्चा सुरू झाली. त्यासाठीच ठाकरे दिल्लीला गेले होते, असेही राजकीय वर्तुळात बोलले गेले.
ठाकरेंनी हा गोंधळ संपवला. ज्या कुणाची मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून नाव जाहीर केले जाईल, त्याला माझा पाठिंबा आहे, ठाकरे म्हणाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट होती, महाविकास आघाडीतील धुसफूस, ज्यामुळे काही ठिकाणी लोकसभेला फटका बसला.
हेही वाचा >> "धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी..."; रामगिरी महाराजांची भेट घेतल्यानंतर CM शिंदे नेमकं काय म्हणाले?
"फक्त तू राहशील किंवा मी राहीन हे आपल्या तिघांत वा आपल्या मित्रपक्षात नको", असे ठाकरे म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, "फक्त जागेवरून मारामाऱ्या करू नका. एखादी जागा जागावाटपात काँग्रेसकडे गेली. काँग्रेसकडे गेली म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीने काम करायचं नाही, असे करायचे नाही. शिवसेनेकडे आली राष्ट्रवादी आणि शिवसेनेने काम करायचं नाही, असे नाही. राष्ट्रवादीला दिली तरी सगळ्यांनी काम केले पाहिजे", असे म्हणत ठाकरेंनी सांगली आणि इतर मतदारसंघात महाविकास आघाडीत घडलेल्या राजकारणावरही बोट ठेवले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT