Asim Sarode : नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड करणारे अ‍ॅड. असीम सरोदे कोण?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

uddhav thackeray maha press conference who is asim sarode advocate mla disqualification case rahul narwekar
uddhav thackeray maha press conference who is asim sarode advocate mla disqualification case rahul narwekar
social share
google news

Who is Asim Sarode : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मंगळवारची महापत्रकार परिषद खुप गाजली. ठाकरे यांनी जनता न्यायालयात जाऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांचा आमदार अपात्रतेचा निकाल किती चुकीचा होता, हे जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठाकरेंनी कायदेशीर मदतीसाठी काही वकिलांना देखील हाताशी घेतले होते. यामधील एक वकील असीम सरोदे (Asim Sarode) होते. असीम सरोदे यांनी जनता न्यायालयात जाऊन नुसत्या कायदेशीरच बाबीच सांगितल्या नाहीत तर पत्रकार परिषद देखील गाजवली. त्यामुळे ठाकरेंची महापत्रकार परिषद गाजवणारे असीम सरोदे कोण आहेत? ,हे जाणून घेऊयात. (uddhav thackeray maha press conference who is asim sarode advocate mla disqualification case rahul narwekar)

असीम सरोदे कोण?

असीम सरोदे हे प्रसिद्ध वकील आहेत. त्यांचा कायदेशीर अभ्यास तांडगा आहे. भारतीय संविधानाचा देखील त्यांचा अभ्यास आहे. सरोदे राज्यासह देशातील विविध सामाजिक,राजकीय मुद्यावर आपलं परखड मत मांडत असतात. मानवी हक्कावर त्यांचा सखोल अभ्यास आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण बार असोसिएशनचे पुण्याचे ते अध्यक्ष आहेत.

हे ही वाचा : Maharashtra Politics : बाळासाहेबांनी रात्रीत डाव फिरवला अन् देवरा…; शिवसेनेचा ‘तो’ किस्सा

कायदेशीर लढा देणार

दरम्यान काही महिन्यापुर्वीच संसदेत घुसखोरी करून अश्रु धुरांचे नळकांड्या फोडल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी असलेल्या अमोल शिंदेच्या बाजूने कोर्टात कायदेशीर लढा देण्याची भूमिका असीम सरोदे यांनी मांडली होती. यामुळे देखील सरोदे प्रचंड चर्चेत आले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सरोदेंचे पत्रकार परिषदेतले महत्वाचे मुद्दे

ठाकरेंच्या या महापत्रकार परिषदेत असीम सरोदे यांनी अत्यंत मजबूतीने बाजू मांडली होती. पक्षांतर कंस करायच याबाबतची कायदेशीर बाराखडी प्रस्थापित करणारा निर्णय म्हणून राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाकडे आपल्याला पाहायला मिळाले. ही कायदेविरोधी प्रवृत्ती आहेत, त्या विरोधात जनतेच्या न्यायालयात बोलले पाहिजे, असे देखील मत असीम सरोदे यांनी मांडले. राहुल नार्वेकर यांच्यासारख्या व्यक्तीने निर्णय दिल्यामुळेच लोकशाही मारली जात असल्याचा गंभीर आरोपही सरोदे यांनी यावेळी केला होता.10 जानेवारी 2024 चा निर्णय पाहता त्याची चिरफाड आवश्यक आहे. या निर्णयातून लोकशाही कशी मारली जाते, हे सुद्धा सिद्ध होते, असे देखील सरोदेंनी सांगितले.

हे ही वाचा : Ram Mandir: ‘वाल्मिकींचा राम खरा कसा म्हणायचा?’, भालचंद्र नेमाडेंचा रामायणावरच अविश्वास

शिवसेनेत फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंसह काही आमदार गुवाहाटीला पळून गेले होते. त्यांच्या पळून जाण्याला मी बंडखोरी म्हणत नाही असे म्हणत त्यांनी शिंदे गटालाच अपात्र ठरवले. राजकीय पक्षात फूट पडल्यानंतर आधी पक्ष स्थापण केला पाहिजे. मात्र शिंदेंना ना गट स्थापन केला ना पक्ष स्थापण केला. त्यामुळे पळून गेलेले आमदार हे अपात्र ठरत असल्याचे त्यांनी कायदेशीर दाखला देत सांगितले.

ADVERTISEMENT

लोकशाही मार्गाने आणि लोकांच्या मतदानावर स्थापन झालेले सरकार उलथवून टाकण्यासाठी राज्यपालांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा हे अत्यंत दुःखद असल्याची खंतही असीम सरोदे यांनी व्यक्त केली. त्या काळात आणि नंतरही राज्यपालांची भूमिका ही संशयास्पद असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT