Uddhav Thackeray : ‘मिंधेंनीच मला गुंड बनवलं’, ठाकरेंची CM शिंदेंवर तोफ; गोळीबारावर काय बोलले?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

uddhav thackeray criticize cm eknath shinde on ganpat gaikwad firing case ulhasagar police station mahesh gaikwad
uddhav thackeray criticize cm eknath shinde on ganpat gaikwad firing case ulhasagar police station mahesh gaikwad
social share
google news

Uddhav Thackeray Criticize CM Eknath Shinde on Ganpat Gaikwad Firing case : उल्हासनगर हिललाईल पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाडांवर (Mahesh Gaikwad) भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या गोळीबार प्रकरणावर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गणपत गायकवाडांच्या गोळीबारानंतर व्हिडिओ चित्रीकरण लगेच बाहेर कसे आले? सीसीटीव्ही फुटेज नेमके कुणी मागितले होते? असा सवाल करत ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना (Cm Eknath Shinde) कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. (uddhav thackeray criticize cm eknath shinde on ganpat gaikwad firing case ulhasagar police station mahesh gaikwad)

उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी सावंतवाडीत बोलताना ठाकरेंनी उल्हासनगर गोळीबार प्रकरणावर भाष्य केले. गणपत गायकवाड यांनी जो गोळीबार केला. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण पटकन बाहेर कसे आले? ते सीसीटीव्ही फुटेज कुणी मागितलं होते? असा संशयास्पद सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

हे ही वाचा : Devendra fadnavis : भुजबळांचा असा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी…’, फडणवीसांनी काय सांगितलं?

तसं पाहायला गेलं तर ‘गणपत गायकवाडांच्या सीसीटीव्ही फुटेजची गरजच नव्हती’.’कारण त्यांनीच कबुल केलेले, मीच गोळ्या घातल्या’. ‘मी गणपत गायकवाडांची बाजू घेत नाही’. पण गणपत गायकवाडाने सांगितले, ‘हा मिंधे जर मुख्यमंत्री असेल तर या राज्यात गुंडांची पैदास होईल. मिंधेनीच मला गुंड बवनलं. ‘एक बाप म्हणून मी पिसाळलो. माझे करोडो रूपये मिधेंकडे आहे.’ गणपत गायकवाड तूरूंगात गेले आहेत कारण त्यांनी गुन्हाच कबूल केला आहे. पण मिंधेंचे जे करोडो रूपये आहेत, मिंधेंमुळे याला गुंडगिरी करावी लागली, त्या माणसाला काही शिक्षा होणार आहे की नाही त्याला अटक होणार आहे की नाही. आता बघू मोदी गँरंटी कुणाला पावते. मिंधेना पावते की त्यांच्याच भाजप नेत्याला पावते, असा सवाल देखील त्यांनी भाजपला केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मिंधे आणि मिधेंच्या पोरांनी त्याच्या वाटेत येणाऱ्याला उचकवून आता बाजूला केला असेल, तो तूरूंगात सडला की तिकडे मतदार संघात कोणीच राहणार नाही आपल्याला विरोध करायला,असा गंभीर आरोप देखील ठाकरेंनी मुख्यमंत्री शिदेंवर केला.

हे ही वाचा : Manoj Jarange चा भुजबळांवर हल्लाबोल! ‘सरकारवर शंका घ्यायची, फडणवीस-अजित पवारांना…’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT