Uddhav Thackeray : ठाकरे पंतप्रधानांवर कडाडले, मोदींना ‘गॅरंटी’वरून सुनावले!
2024 च्या लोकसभेची सेमीफायनल भारतीय जनता पक्षाने जिंकली आहे. पण सेमी फानयल जिंकणारा फायनल जिंकतोच असे नाही, असा टोला सामनातून पंतप्रधान मोदींवर लगावला आहे.
ADVERTISEMENT
Saamana Editorial Criticize Pm Narendra Modi : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचे निकाल लागले आहेत. यामध्ये राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यात भाजपने सत्ता आणली आहे. तर तेलंगण राज्य काँग्रेसने जिंकले आहे. या निकालाचा अनेक तज्ञ मंडळी वेगवगेळा अर्थ काढत आहेत. त्यात आता सामना अग्रलेखातून देखील या निवडणुकीचे विश्लेषण करण्यात आले आहे. तसेच मोदींच्या गॅरंटीवरून देखील सामना अग्रलेखातून त्यांना घेरण्यात आले आहे. (uddhav thackeray saamna criticize pm narendra modi 5 state assembly election result 2023 saamna editorial)
ADVERTISEMENT
सामना अग्रलेखात काय?
2024 च्या लोकसभेची सेमीफायनल भारतीय जनता पक्षाने जिंकली आहे. पण सेमी फानयल जिंकणारा फायनल जिंकतोच असे नाही, असा टोला सामनातून पंतप्रधान मोदींवर लगावला आहे. तसेच पाच राज्यातील निकालावून जनतेने मोदींच्या गॅरंटीवर शिक्कामोर्तब केले आहे, तर राहुल गांधीच्या ‘मोहब्बत की दुकाना’वर शुकशुकाट झाल्याचा दावा भाजपने केला आहे.
हे ही वाचा : मापात पाप! पेट्रोल पंपावर असंही फसवू शकतात, इथे ठेवा लक्ष
मोदींच्या गॅरंटीवरून भाजपने या निवडणूका जिंकल्याचा दावा केला जाता आहे. याच मोदींच्या गॅरंटीवर आता सामनातून ताषेरे ओढले आहेत. मोदींनी 2014 पासून अनेक गॅरंट्या दिल्या. परदेशातील काळा पैसा परत आणण्याची गॅरंटी त्यांनी दिली. भ्रष्टाचाऱ्यांना तुरूंगात टाकण्याची गॅरंटी होती. दहशतवाद संपविण्याच्या गॅरंटीचे काय झाले? पेट्रोल किमान 40 रूपये करण्याची गॅरंटी होती. शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करण्याची गॅरंटी होती. तुमच्या या गॅरंटीचे काय झाले? असा खरमरीत सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.
हे वाचलं का?
अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याची गॅरंटी होती. मराठा व धनगरांना आरक्षणाची गॅरंटी होती, महाराष्ट्र टोलमुक्त करण्याची गॅरंटी होती. खासदार दत्तक योजनेतून ‘गावे’ स्वावलंबी बनविण्याची गॅरंटी होती. पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानात आणण्याची गॅरंटी होती. महागाई कमी करून जनतेला ‘अच्छे दिन’ दाखविण्याची गॅरंटी होती. या सर्व गॅरंट्या पंतप्रधान मोदी यांनीच दिल्या होत्या व त्यातील एकही गॅरंटी पूर्ण झाल्याचे दिसत नाही. तरीही तीन राज्यांत भाजपचा विजय होतो. हीच लोकशाहीतील गंमत आहे.
हे ही वाचा : Rajasthan: ‘तात्काळ Non Veg चे ठेले बंद करा’, निवडणूक जिंकताच भाजप आमदाराचा अधिकाऱ्याला फोन
विरोधकांनी ईव्हीएमचा अजिबात खापर फोडले नाही. तुमच्याच डोक्यात ईव्हीएमचा किडा आहे. यावर काही टिल्ले-पिल्ले सांगतात, मग ईव्हीएमने तेलंगणात कसा विजय मिळवला? मोठा दरोडा लपविण्यासाछी थोडा माल मोकळा ठेवून दरोडेखोर पळाले आहेत, हीच यांची स्ट्रेटेजी आणि चाणक्यनीती असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. जनतेचा खरा मुड तपासायचा असेल तर निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायची हिंमत दाखवा.लोकशाहीसाठी तेवढी एक गॅरंटी द्याच, असे आव्हानच सामनातून मोदींना देण्यात आले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT