Uddhav : ठाकरेंचं थेट PM मोदींना आव्हान, ‘हिम्मत असेल तर…’
शिवसेना (UBT)च्या शिवालय या राज्य जनसंपर्क कार्यालयाचे आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटन झाले. या उद्धाटनानंतर माध्यमांशी बोलताना ठाकरेंनी पाच राज्यांच्या निकालावर प्रतिक्रिया दिली.
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray Challenge Pm Narendra Modi : पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या निकालात तीन राज्यात भाजपची सत्ता आली तर एक राज्य कॉग्रेसने जिंकले.तर मिझोरममध्ये स्थानिक पक्षाने बाजी मारली. निवडणूकीच्या या निकालानंतर आता शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी थेट पंतप्रधान मोदी (Pm Narendra Modi) यांना आव्हान दिले आहे. जर पंतप्रधान मोदी याच्यात हिंमत आणि दम असेल तर त्यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक (2024 lok sabha election) बॅलेट पेपर घेऊन दाखवावी, असे थेट आव्हानच उद्धव ठाकरेंनी मोदींना दिले. (uddhav thackeray shiv sena ubt direct challenge to pm narendra modi about 2024 lok sabha election)
ADVERTISEMENT
शिवसेना (UBT)च्या शिवालय या राज्य जनसंपर्क कार्यालयाचे आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटन झाले. या उद्धाटनानंतर माध्यमांशी बोलताना ठाकरेंनी पाच राज्यांच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. पाच राज्यांच्या निवडणूका झाल्या आहेत, भाजपलाही भरघोस यश मिळालंय. त्यामुळे मोदींची इतकीच लाट आहे, तर या लाटेत बॅलेट पेपरवर लोकसभेची निवडणूक घेऊन दाखवा आणि जिकूनगी दाखवा असे आव्हानच ठाकरेंनी मोंदींना दिले.
हे ही वाचा : Chandrayaan 3 Returns Home : ‘चांद्रयान 3’ ची घरवापसी! ‘इस्त्रो’चा ‘हा’ मोठा प्रयोग यशस्वी
एक्झिट पोलचे जर निकाल वेगळे ठरत असतील. मतदारांना जर प्रश्न पडत असेल तर ती शंका दुर केली पाहिजे. त्यामुळे त्यांच्यात (पतंप्रधान) हिम्मत आणि दम असेल तर लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन जिंकून दाखवावी. तत्पुर्वी मुंबई महापालिकेचीही निवडणूक बॅलेट पेपर घ्यावी असे ठाकरे म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
मुख्यमंत्री शिंदेंनाही हाणला टोला
उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनाही टोला लगावला आहे. शिवसेना आता सरकारमध्ये नाही, त्यामुळे ज्यांना वाटतंय मोकळ रान झालंय, त्यांना वठणीवर आणण्यासाठी 16 डिसेंबरला दुपारी 3 वाजता धारावीतून गौतम अदानींच्या ऑफिसपर्यंत आंदोलन करण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. या विराट मोर्चाचे नेतृत्व उद्धव ठाकरे करणार आहेत.
हे ही वाचा : Nalasopara Crime : बंद खोली, कुजलेला मृतदेह अन्…, अल्पवयीन मुलीची हत्या कुणी केली?
धारावीकर पिढ्यानपिढ्या झोपडपट्टीत राहत आहेत, त्यांना हक्काची घर मिळाली पाहिजेत. गिरणी कामगारांना, सरकारी कर्मचाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना आणि सफाई कामागारांना घरे मिळाली पाहिजेत अशी मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT