Uddhav Thackeray : पेपरफुटीवरून ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, ''खोटं नरेटिव्ह...''

मुंबई तक

ADVERTISEMENT

udhhav thackeray reply devendra fadnavis on paper tear maharashtra assembly session
्यामुळे आमच्या काळात कोणत्या परीक्षा झाल्या त्याचं ज्याचे पेपर फुटले?
social share
google news

Uddhav Thackeray Reply Devendra fadnavis : सर्वाधिक पेपरफुटीवर ही उद्धव ठाकरे यांच्या काळात झाल्याचा आरोप उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांच्या या आरोपावर आता उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला आहे. ''माझ्या काळात कोरोना होता. त्यामुळे आमच्या काळात कोणत्या परीक्षा झाल्या त्याचं ज्याचे पेपर फुटले? असा प्रतिसवालच त्यांना केला आणि खोटं नरेटिव्ह यालाच म्हणतात, असे प्रत्युत्तर दिले. (udhhav thackeray reply devendra fadnavis on paper tear maharashtra assembly session) 

उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले. माझ्या काळात कोरोना होता. पेपरफुटीचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा आम्ही परिक्षा रद्द करून पुन्हा परिक्षा घेतल्या. त्यानंतर कोणत्या परिक्षा झाल्या ज्याचे पेपर फुटले? हा नरेटिव्ह शब्द आणला तो हाच नरेटिव्ह आहे, खोटं नरेटिव्ह यालाच म्हणतात, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केला आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी... ठाकरे-फडणवीसांची भेट, लिफ्टच्या बंद दाराआड काय ठरलं?

विधानभवन परिसरात आज उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. या भेटीवर उद्धव ठाकरे म्हणाले की, ना... ना... करते प्यार, तुम्ही से कर बैठे असे होणार नाही, यांचा पटोलेशी काही संबंध नाही. लिफ्टमध्ये झालेली भेट योगायोगाने घडली आहे. भिंतीला कान असतात, पण लिफ्टच्या भींतीला कान असतात, त्यामुळे यापुढे गुप्त बैठका लिफ्टमध्येच घेऊ, असे देखील ठाकरेंने यावेळी मिश्किलपणे सांगितले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर देखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे.  ''हे ड्रग्ज येतात कुठून? उद्योगमंत्री काय करताहेत, त्यांचे वेगळे उद्योग सुरु आहेत का? ड्रग्ज प्रकरण महाराष्ट्राची पिढी नासवणारी गोष्ट आहे. आम्ही प्रश्न विचारतोय म्हणून नाही तर मुळापर्यंत जाणं गरजेचं असल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 

हे ही वाचा : 'मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींना...', मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान!

मुलींच्या मोफत शिक्षणाचं आश्वासन चंद्रकांत दादांनी दिलं होतं, आज ते मला चॉकलेट देऊन गेले. तसेच योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं. जे पोकळ ठरलं. आता योजनेची चॉलकेट देऊ नका. कारण लोकांची सहनशक्ती आता जवळपास संपत चाललीय. लोकसभेच्या निकालानंतर त्यांना जरी कळलं नसलं तरी आम्हाला कळलं आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT