Maratha Reservation : आंबेडकरांचा जरांगेंना झटका! 'सगेसोयरे'ला विरोध, सरकारकडे 7 मोठ्या मागण्या

मुंबई तक

Vanchit Bahujan Aghadi On Maratha Reservation : प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. मराठा समाजातील लोकांना देण्यात आलेली कुणबी जात प्रमाणपत्रे रद्द करण्याची मागणी वंचितने केली आहे.

ADVERTISEMENT

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने सगेसोयरे शब्दाच्या अंमलबजावणीला विरोध केला आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वंचित बहुजन आघाडीची आरक्षणाबद्दल भूमिका

point

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध

point

सगेसोयरेची अमलबजावणी करण्याला आंबेडकरांचा विरोध

Prakash Ambedkar Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षण आंदोलना पाठोपाठ ओबीसी आंदोलनाने जोर धरला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सगेसोयरे शब्दाला ओबीसी समुदायातून विरोध होत आहे. आता प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने याला विरोध केला आहे. (Prakash Ambedkar led Vanchit Bahujan Aghadi opposed to implementation of sagesoyare)

राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना वंचित बहुजन आघाडीने आरक्षणासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमातून पक्षाने 11 ठराव मांडण्याचे आणि त्या ठरवाचे बॅनर शहरातील मुख्य चौकात लावण्याचे निर्देश देण्यात आले. या ठरवामध्ये आरक्षणाच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आरक्षणावरून पेटलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी वादाच्या संदर्भातही काही ठराव घेण्यात आले आहेत. 

वंचित बहुजन आघाडीने घेतलेले ठराव पुढील प्रमाणे 

1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 साली सायमन कमिशन पुढे साक्ष देताना भारतात बहुजन समाज म्हणजेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसींना आरक्षणाची मागणी केली. परंतु शाहू महाराजांनी स्वतः च्या राज्यामध्ये 1902 साली आरक्षण लागू करून एक सामाजिक क्रांती घडवली. राज्य व्यवस्थेमध्ये एससी, एसटी आणि शूद्र यांना प्रशासनामध्ये स्थान नव्हतं. ते स्थान मिळवण्याचा मार्ग शाहू महाराजांनी मोकळा केला. यासाठी शाहू महाराज हे नेहमीच बहिष्कृत आणि नाही रे वर्गाचे सदैव मार्गदर्शक आणि वंदनीय राहतील. अजूनही या समूहाचा सहभाग सत्तेमध्ये होऊ नये, अशी विचारसरणी जिवंत आणि कार्यरत आहे. तेव्हा आरक्षणवादी आणि समतावादी भूमिका नुसती शब्दांनी नाही तर कृतीने सुद्धा एससी, एसटी आणि शूद्र यांनी अंगिकरली पाहिजे, असा ठराव वंचितने केला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp