Vidhan Parishad Election: कोणाचे आमदार कुठल्या हॉटेलमध्ये, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Vidhan Parishad Election 2024: महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. जाणून घ्या याच निवडणुकीच्या नेमक्या राजकारणाविषयी.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

विधानपरिषद निवडणुकीची उत्सुकता शिगेला

महायुती की महाविकास आघाडी कोण मारणार बाजी

दगाफटका होऊ नये यासाठी आमदार हॉटेल्समध्ये
Vidhan Parishad Election and Maharashtra Politics: मुंबई: महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. 11 जागांसाठी एकूण 12 अर्ज आल्याने आणि कुणीही अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक होणार हे निश्चित झालं. राज्यातील राजकीय समीकरणं लक्षात घेतल्यास ही निवडणूक रंजक बनली आहे. कारण छुप्या पद्धतीने मतदान होणार असल्याने क्रॉस व्होटिंगही होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मतदानापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेसह महायुतीमधील पक्षांना दगाफटका होण्याची भीती आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हॉटेल/रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरू झालं आहे. (vidhan parishad election whose mlas in which hotel political earthquake again in maharashtra)
भाजप, शिवसेना (UBT), शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये राहण्याचे आदेश दिले आहेत.
हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana List: 1500 रुपये मिळणार की नाही? असं तपासा यादीत तुमचं नाव!
कोणत्या पक्षाचे आमदार कोणत्या हॉटेलमध्ये?
भाजपा- ताज प्रेसिडेन्सी, कुलाबा
शिवसेना- ताज लँड्स एंड, वांद्रे
शिवसेना (UBT)- ITC ग्रँड मराठा, परळ
NCP (अजित पवार)- हॉटेल ललित, अंधेरी विमानतळ
काय आहे विधानपरिषद निवडणुकीचं गणित?
महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे संख्याबळ 274 आहे. विधानसभेचे एकूण संख्याबळ हे 288 आहे. सध्याचं संख्याबळ लक्षात घेता विधानपरिषदेची एक जागा जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 23 मतांची आवश्यकता आहे. विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे 5, शिवसेना (शिंदे गट) 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 2 उमेदवार रिंगणात आहेत. म्हणजे महायुतीचे एकूण 9 उमेदवार हे रिंगणात आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने आपले 3 उमेदवार या निवडणुकीत उतरवले आहेत.