संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात थेट वाल्मिक कराडचं नाव, CID ने पहिल्यांदाच...
Walmik Karad: संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पहिल्यांदाच वाल्मिक कराड यांचं नाव घेण्यात आलं आहे. सीआयडीच्या वतीने थेट कोर्टातच त्याचं नाव घेण्यात आल्याने आता कराड हा अधिक अडचणीत आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वाल्मिक कराडला कोर्टाने सुनावली 15 दिवसांची कोठडी

सीआयडीने कोर्टात केला खळबळजनक दावा

संतोष देशमुख हत्या प्रकरणीही वाल्मिक कराडची होणार चौकशी
Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad: बीड: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पहिल्यांदाच वाल्मिक कराड याच्यावर संशय व्यक्त केला आहे. आतापर्यंत केवळ खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, काल (31 डिसेंबर) कराडला कोर्टात हजर केल्यानंतर सीआयडीने मात्र, खंडणी आणि संतोष देशमुख यांची हत्या या प्रकरणाचा संबंध असू शकतो असा युक्तिवाद करत कोर्टाकडे कराडच्या 15 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. ज्याला कोर्टानेही मान्यता दिली. (walmik karad name directly in santosh deshmukh murder case cid makes a big demand directly in court)
'हत्येचा मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा फरार आहे त्यामुळे वाल्मिक कराड याची कोठडी महत्त्वाची आहे. कराड याची कोठडी मिळाल्याशिवाय सुदर्शन घुले याचा शोध घेणे हे कठीण व अवघड होईल. हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात कराडचा सहभाग आहे हे तपासायचे आहे.' असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला.
हे ही वाचा>> वाल्मिक कराड आला शरण.. CID अधिकारी म्हणाले आम्ही तर...
आतापर्यंत केवळ खंडणी प्रकरणातच वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जात होतं. पण पहिल्यांदाच त्याचं नाव हत्या प्रकरणात अधिकृतरित्या घेण्यात आल्याने आता त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सरकारी वकिलाने ऐनवेळी केस लढण्यास दिला नकार
वाल्मिक कराडच्या खंडणी केस प्रकरणातील वकील बदलण्यात आला आहे. सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या एस. एस. देशपांडे यांनी अचानक आपण ही केस लढविण्यास तयार नसल्याचं सांगितलं. त्याबाबत त्यांनी कोर्टाकडे पत्रंही दिलं. वैयक्तिक कारणास्तव त्यांनी ही केस लढण्यास नकार दिला आणि अन्य वकील नेमावा असं पत्रात म्हटलं. त्यानंतर जे. बी. शिंदे यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.