Sunil Kanugolu : काँग्रेसला दिलं कर्नाटक जिंकून! कोण आहेत कानुगोलू?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

who is sunil Kanugolu major strategists for the congress in the state karnataka
who is sunil Kanugolu major strategists for the congress in the state karnataka
social share
google news

Who is sunil Kanugolu : कर्नाटक विधानसभा निवडणूकीचा निकाल लागला असून कॉंगेसने बहुमताने विजय मिळवला आहे. कॉंग्रेसने हा विजय मिळवून दक्षिणेकडील राज्यात पुनरागमन केले आहे.क़ॉग्रेसच्या या विजयाचे श्रेय राहुल गांधींपासून, मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटक कॉग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांना जाते. मात्र या विजयात खरा हिरो पडद्यामागेच राहतो. या रियल हिरोचे नाव सुनील कानुगोलू आहे. नेमका सुनील कानुगोलू कोण आहे?ज्याने कॉग्रेसला कर्नाटकमध्ये विजय मिळवून दिला? हे जाणून घेऊयात. (who is sunil Kanugolu major strategists for the congress in the state karnataka election 2023 assembly result)

ADVERTISEMENT

कॉंग्रेसचा प्रमुख रणनीतीकार

सुनील कानुगोलू हा कॉंग्रेसचा कर्नाटक निवडणूकीतील प्रमुख रणनीतीकार होता. कर्नाटकमधील कॉंग्रेसच्या विजयासाठी त्यानेच रणनीती आखली होती. संपूर्ण निवडणुकीदरम्यान त्याने जनतेशी संपर्क बनवून ठेवला. तसेच भ्रष्टाचार आणि गैरकारभाराच्या आरोपात अडकलेल्या भाजपशासित सरकारचा पर्दाफाश केला.सुनील कानुगोलू प्रचारासाठी नवनवीन पद्धती शोधून काढल्या आणि जनतेची नस ओळखून कॉग्रेसला कर्नाटकमध्ये विजय मिळवून दिला.

Video : निकाल लागला अन् डीके शिवकुमारांना कोसळलं रडू

‘या’ पक्षांसाठीही रणनीती आखली?

कॉंग्रेसने गेल्या वर्षीच सुनील कानुगोलूला निवडणूक रणनीतीकार म्हणून पक्षात स्थान दिले होते. सुनील कानुगोलूने याआधी DMK,AIADMK आणि भाजपसोबत काम केले आहे. सुनील कानुगोलूनेने 2017 साली उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत भाजपसाठी काम केले आहे. तसेच 2019 च्या संसदीय निवडणुकीत DMK आणि 2021 च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत AIADMKसाठी निवडणूक रणनीती बनवली होती. सुनील कानुगोलूने माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या अनुपस्थितीत AIADMKसाठी रणनीती आखली आणि चमकदार कामगिरी केली.

हे वाचलं का?

हेही वाचा >> Karnataka Results 2023 : भाजपचं टेन्शन वाढलं! 2024 मध्ये असा होणार परिणाम?

प्रशांत किशोर यांच्यासोबत देखील काम केले

सुनील कानुगोलूने प्रशांत किशोरसोबत देखील काम केले आहे. मॅकिन्सचे माजी सल्लागार सुनील कानुगोलू 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख घटत होते. तसेच त्यांनी भाजपच्या असोसिएशन ऑफ बिलियन माइंडस (ABM)चे प्रमुख म्हणून काम केले आहे. सुनील कानुगोलूने ABM चे नेतृत्व केले आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधील भाजपच्या प्रचारात महत्वाची भूमिका बजावली. या सर्व निवडणूकांमध्ये भाजप जिंकला किंवा निवडणूकीत सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला.

हेही वाचा >> Karnataka Election Result : भाजपला ‘या’ चुका भोवल्या, पराभवाची 6 कारणे

गेल्या वर्षीच सुनील कानुगोलू कॉंग्रेसशी जोडला गेला आणि देशातल्या सर्वात जुन्या पक्षासाठी रणनीती बनवायला सुरू केली. कन्याकुमारी पासून काश्मिरपर्यंत काढलेल्या राहुल गांधीच्या भारत जोडो य़ात्रेचे श्रेय देखील सुनील कानुगोलूलाच जाते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT