Yugendra Pawar : शरद पवारांना साथ, अजित पवारांविरोधात सख्खा पुतण्या मैदानात?
Yugendra Pawar Ajit Pawar : श्रीनिवास पवार याचे सुपूत्र युगेंद्र पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली. त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

युगेंद्र पवारांची आजोबाला साथ

अजित पवारांसमोर कुटुंबाचंच आव्हान

बारामतीत दिसणार राजकीय संघर्ष
Yugendra Pawar News : (वसंत पवार, बारामती) अजित पवारांनी बंड केल्यापासून बारामती आणि पवार कुटुंब सातत्याने चर्चेत आहे. काका-पुतण्यातील (शरद पवार विरुद्ध अजित पवार)संघर्ष शिगेला गेलेला असतानाच आता आणखी एका पुतण्याची एन्ट्री झालीये. अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपूत्र असलेल्या युगेंद्र यांच्या नावाची आता विधानसभा निवडणुकीसाठीही चर्चा सुरू झाली आहे. (who is yugendra pawar?)
"माझं कुटुंब सोडलं तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील. मला एकटं पाडण्यासाठी कसे काहीजण जीवचं रान करतात ते बघा', असं अजित पवारांनी बारामतील एका कार्यक्रमात म्हटलं. त्याला काही दिवस लोटत नाही, तोच युगेंद्र पवारांच्या एन्ट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
युगेंद्र पवारांनी बारामतीतील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली आणि त्यामुळेच युगेंद्र पवारांबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांच्या एन्ट्रीचे अर्थ समजून घेण्याआधी युगेंद्र पवार कोण आहेत, ते समजून घ्या.
कोण आहेत युगेंद्र पवार?
युगेंद्र पवार फारसे चर्चेत नसले, तरी ते अनेक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याशी जोडले गेलेले आहेत. परदेशात उच्च शिक्षण घेतलेले युगेंद्र पवार यांना शरद पवारांनीच विद्या प्रतिष्ठाणच्या कामात सहभागी करून घेतलं.