Baramati: 'तेव्हा त्यांना सांगतो कसा आहे अजित पवार.. तेव्हा काय सोडणार नाही..' अजित पवारांनी थेट दिली धमकी?

ADVERTISEMENT

अजित पवारांचा धमकीवजा इशारा
अजित पवारांचा धमकीवजा इशारा
social share
google news

Ajit Pawar Baramati Lok Sbaha: बारामती: लोकसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. मात्र, त्याआधीच बारामतीत त्याचे पडघम वाजू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांकडे गेल्यानंतर त्यांनी बारामती मतदारासंघात सुप्रिया सुळेंना पराभूत करण्यासाठी आतापासूनच आक्रमक प्रचार सुरू केला आहे. एवढंच नव्हे तर जे शरद पवार गटात गेले आहेत त्यांना जाहीर भाषणातून धमकीवजा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे. (ajit pawar directly threatened in public meeting in baramati know what exactly ajitdada said)

बारामतीत काल (16 फेब्रुवारी) अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. त्यावेळी बोलताना अजित पवार थेट म्हणाले की, 'पुढे कधी तरी त्यांना अजित पवारची गरज लागेल.. तेव्हा त्यांना सांगतो कसा आहे अजित पवार.. तेव्हा काय सोडणार नाही.. तेव्हा कोणी यायचं नाही.. नाही नाही दादा जाऊ दे, जाऊ दे दादा..' असं विधान अजित पवारांनी यावेळी केलं.

हे ही वाचा >> 'भास्कर जाधव आ%#$@ भ%&^...', निलेश राणेंनी पातळीच सोडली

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बहुसंख्य आमदार हे अजित पवारांसोबत गेले. तसेच काही पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत गेले आहेत. मात्र, असं असलं तरीही अद्यापही बरेच जण हे शरद पवारांसोबत कायम आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या पराभवासाठी अजित पवार हे आपली सर्व ताकद आतापासूनच पणाला लावत आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'तेव्हा काय सोडणार नाही..', अजित पवारांनी कोणाला दिली उघड धमकी?

'तुम्ही म्हणाल की, अजित तू फक्त बोलतोय.. पण उमेदवार कोण? ते तर सांग.. उमेदवार जोपर्यंत आमची महायुती एकत्र बसून कुठल्या जागा कोणा-कोणाला हे ठरवत नाही तोपर्यंत मला उमेदवार जाहीर करता येत नाही.' 

'ज्यांना माझ्यासोबत राहायचंय त्यांनी खुलेपणाने राहा.. दबावाने कोणी बरोबर राहू नका.. आता जसं संदीप गुजर, एस एन जगताप, सतीशमामा खोणे, काटे वकील हे सगळे जणं जसं तिकडच्या बाजूने काम करतायेत.. मला काही वाटत नाही.. तो त्यांचा अधिकार आहे.. त्यांचा विचार आहे, आपल्याला काय करायचंय.. पण पुढे कधी तरी त्यांना अजित पवारची गरज लागेल.. तेव्हा त्यांना सांगतो कसा आहे अजित पवार.. तेव्हा काय सोडणार नाही.. तेव्हा कोणी यायचं नाही.. नाही नाही दादा जाऊ दे, जाऊ दे दादा.. किंवा ते मला म्हणतील आमदारकीला तुम्हीच.. ते तसलं मला नाही चालणार..' 

'मला या वेळेस तुमच्याकडून माझी आग्रहाची विनंती आहे की, आपल्याला राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याकरिता काम केलं पाहिजे.' 

ADVERTISEMENT

'मी राष्ट्रीय अध्यक्ष झालो.. मी घरातलाच आहे ना.. वरिष्ठ म्हणत होते सुप्रियाला अध्यक्ष करा.. सुप्रियाला केलं काय अन् अजित झाला काय.. एकच आहे ना.. जर तुम्ही घर एक समजता तर..  मी अनंतरावांच्या पोटी आलो म्हणून मी अध्यक्ष नको का? आता कोणाच्या पोटी कोणी यायचं हे काय माझ्या हातात आहे?'

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> '..तर मी विधानसभा लढवणार नाही', अजितदादांचा नवा डाव

'आता हे जे काही सुरू आहे त्यात समजा माझ्या बाकीच्या परिवाराने एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी मला एकटं पाडू नये एवढी विनंती..' असं विधान अजित पवार यांनी यावेळी केलं आहे. 

यामुळे यंदा बारामती लोकसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार असून बारामतीकर याबाबत नेमका कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT