Nilesh Rane: 'आ%#$@... भ%&^...', निलेश राणेंनी पातळीच सोडली, भास्कर जाधवांना भर सभेत शिवीगाळ
Nilesh Rane vs Bhaskar Jadhav: गुहागरमधील जाहीर सभेत निलेश राणेंनी अत्यंत खालच्या शब्दात भास्कर जाधव आणि ठाकरे कुटुंबावर टीका केली. अत्यंत शिवराळ भाषेत त्यांनी भास्कर जाधव यांचा समाचार घेतला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

निलेश राणेंनी पातळी सोडली

भास्कर जाधवांना जाहीर सभेत शिव्या

ठाकरे कुटुंबावरही जहरी टीका
Nilesh Rane Speech: गुहागर: भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आज (16 फेब्रुवारी) शिवसेना (UBT) नेते आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचा बालेकिल्ला असलेल्या गुहागरमध्ये जाहीर सभा घेतली. पण याच सभेत बोलताना निलेश राणेंनी कोणतेही राजकीय संकेत न पाळता सर्वांसमोर भास्कर जाधव यांना अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केली. याशिवाय त्यांनी ठाकरे कुटुंबीयांवर देखील जहरी टीका केली. (bjp leader nilesh rane dropped the level used bad words bhaskar jadhav in a public meeting and highly venomous criticism on the thackeray family)
निलेश राणेंच्या सभेआधी दगडफेक
दरम्यान, या सभेला येण्यापूर्वी चिपळूणमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना अक्षरश: भिडले होते. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांकडून यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक देखील करण्यात आली. ज्यामध्ये निलेश राणेंच्या ताफ्यातील अनेक गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. म्हणून पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या.
निलेश राणेंची भर सभेत शिवीगाळ
या सगळ्या राड्यानंतर गुहागरमध्ये झालेल्या जाहीर सभेत निलेश राणे यांनी मात्र सगळ्या मर्यादा सोडून भास्कर जाधव आणि ठाकरे कुटुंबावर हल्ला चढवला..
निलेश राणेंचं गुहागरमधील भाषण जसंच्या तसं...
'उद्धव ठाकरे जेव्हा कणकवलीला आले होते.. कणकवलीमध्ये हा तुमचा चिपळूणचा भास्कर नको नको ते शब्द बोलला.. नितेश राणेला बोललेलं मला चालतं पण राणे साहेबांना बोललेलं मला चालत नाही. आमच्या नेत्यांना वेडवाकडं बोलायचं नाही.'