Shiv Sena : CM शिंदेंनी ठाकरेंना का दिलं नाही निमंत्रण? आमदाराने केला खुलासा
Uddhav Thackeray vs eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीचे उद्धव ठाकरे यांना निमंत्रणच दिले नाही. त्यावरून राजकारण सुरू झाले असून, शहाजीबापू पाटील यांनी यामागील कारण सांगितलं.
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय आमदारांची बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षण देण्यासंदर्भात चर्चा करून ठराव करण्यात आले. पण, सरकारने बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीचे उद्धव ठाकरेंनाच निमंत्रण न दिलं गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. त्यावरून ठाकरेंच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लक्ष्यही केलं. पण, याच कारण शिंदेंसोबत असणाऱ्या शहाजी बापू पाटील यांनी खुलासा केला.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील कुणालाही निमंत्रित करण्यात आलेलं नव्हतं. यावरून ठाकरे गटाकडून शिंदेंवर टीका करण्यात आली.
शिंदेंनी उद्धव ठाकरेंना का बोलावलं नाही?
शहाजी बापू पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याबद्दल खुलासा केला. उद्धव ठाकरेंना निमंत्रण न देण्यामागचं कारण सांगताना शहाजी बापू पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचा पक्ष निवडणूक आयोगाच्या यादीत अधिकृत नसल्याने त्यांना बोलवलं नाही.”
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Maratha Reservation : ‘या’ मराठा व्यक्तीला मिळालं पहिलं कुणबी जात प्रमाणपत्र
“सरकार पडेल याकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे डोळे लागले आहेत. परंतु संजय राऊत यांचे यापूर्वीच विसर्जन झाले आहे”, असा टोला शहाजी बापू पाटील यांनी लगावला.
अंबादास दानवेंनी व्यक्त केली नाराजी
उद्धव ठाकरेंना बैठकीचं निमंत्रण न दिल्याबद्दल विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नाराजी व्यक्ती केली. “राज्य सरकारने आजच्या सर्वपक्षीय बैठकीत उद्धव ठाकरे यांना न बोलवणे हे चुकीच्या पद्धतीचे राजकारण आहे”, असं ते म्हणाले.
ADVERTISEMENT
संजय राऊत भडकले…
खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावर शिंदे सरकारवर आगपाखड केली. राऊतांनी बैठकीचे पत्र ट्विट करत म्हटलं की, “या सरकारचे करायचे काय? महाराष्ट्र पेटलाय तरी यांचे निर्ल्लज्ज राजकरण सुरूच आहे. मराठा आरक्षणावर सर्व पक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली. त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही.”
ADVERTISEMENT
या सरकारचे करायचे काय?
महाराष्ट्र पेटलाय तरी यांचे निर्ल्लज्ज राजकरण सुरूच आहे. मराठा आरक्षणावर सर्व पक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली.त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही.
शिवसेनेचे 16 आमदार व 6 खासदार आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे.
एक आमदार असलेल्यांना आमंत्रण.एकही… pic.twitter.com/kQ0jdDtdCf— Sanjay Raut (@rautsanjay61) October 31, 2023
हे ही वाचा >> Maratha Reservation : जरांगेंना आवाहन, सर्वपक्षीय बैठकीत काय झाला ठराव?
“शिवसेनेचे 16 आमदार व 6 खासदार आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. एक आमदार असलेल्यांना आमंत्रण. एकही आमदार नाही अशांना देखील बोलावले. पण शिवसेना यांच्या डोळ्यात खुपते. अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावले. ठीक. आम्हाला मानपान नको. पण, प्रश्न सोडवा. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवा. घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच आहे. हिशोबाचे वेळ जवळ येत आहे. जय महाराष्ट्र!”, अशी टीका राऊतांनी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT