NCP : शरद पवारांचं ठरलं! पुण्यातील बैठकीत काय झाला निर्णय?
Sharad Pawar Latest News : पुण्यात शरद पवारांनी बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती समोर आली आहे...
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
शरद पवारांनी घेतली महत्त्वाची बैठक
सुप्रिया सुळे, प्रशांत जगताप यांनी दिली माहिती
महाविकास आघाडीची निवडणुकीची स्ट्रॅटजी ठरली
Nationalist Congress Party Sharadchandra Pawar : शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होणार, या चर्चेने राजकीय वर्तुळात बुधवारी (14 फेब्रुवारी) खळबळ उडाली. शरद पवार यांनी प्रमुख नेत्यांची तातडीने पुण्यात बैठक बोलवल्याने ही चर्चा सुरू झाली होती. मागील सत्यता अखेर समोर आली आहे. त्याचबरोबर पुण्यातील बैठकीत काय चर्चा झाली, याचेही अपडेट समोर आले आहेत. (Why did Sharad Pawar called urgent meeting?)
ADVERTISEMENT
अजित पवार गट मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर शरद पवार गटाकडून हालचाली सुरू आहेत. दरम्यान, शरद पवारांनी पुण्यात प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
शरद पवारांच्या उपस्थितीत बैठकीत काय झाली चर्चा
बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल माहिती देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "बैठकीमध्ये पुढची निवडणूक, महाविकास आघाडीमध्ये ज्या जागा आम्हाला मिळणार आहे, याची माहिती आम्हाला अनिल देशमुख आणि जयंत पाटील यांनी दिली. त्यानंतर प्रचारातील सगळ्यांचा वेळ, त्याचे नियोजन. महाविकास आघाडीच्या पुढच्या सभा."
हे वाचलं का?
"शरद पवारांचं अरविंद केजरीवालांशी आताच बोलणं झालं आहे. त्यांची टीम आणि आपण सगळ्यांनी एकत्र कसं काम करायचं? इंडियाचे कुठले नेते प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार? महाविकास आघाडीचे पुढच्या नियोजनासाठी शरद पवार हे उद्धव ठाकरेंना बोलणा आहे. त्यासंदर्भात उद्या-परवा भेटणार आहेत", अशी माहिती सुळे यांनी दिली.
त्याचबरोबर सुळे असंही म्हणाल्या की, "काँग्रेसच्या वतीने कोण बोलणार? आमचे सर्व उमेदवार, त्यांचा प्रचार, कुठले मोठे जे लोकसभा लढणार नाहीत, ते कुठे प्रचाराला येणार.... शरद पवार किती वेळ देणार, राहुल गांधी किती वेळ देणार, उद्धव ठाकरे किती वेळ देणार, बाळासाहेब थोरात किती वेळ देणार... अशी लोकसभेच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली."
ADVERTISEMENT
शरद पवार सुप्रीम कोर्टात
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, "आज (14 फेब्रुवारी) सकाळी आमचे राज्यभरातील आमदार, खासदार, आजी-माजी मंत्री यांची बैठक शरद पवारांनी घेतली. या बैठकीत सुप्रीम कोर्टात आमची जी केस सुरू आहे. नाव आणि चिन्ह या संदर्भातील निकाल सुप्रीम कोर्टाने दोन-तीन दिवसात द्यावा, अशा प्रकारचा निर्णय झाला आहे." म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी सुप्रीम कोर्टाकडून नवं नाव आणि चिन्ह घेणार आहे.
ADVERTISEMENT
जगताप असंही म्हणाले की, "आम्ही जे थांबलो आहे, ते शरद पवारांच्या प्रेमापोटी, त्यांचे नेतृत्व हे राज्याला मान्य असलेलं नेतृत्व असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा आमचा निर्णय आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आम्हाला दोन-तीन दिवसांत नाव आणि चिन्ह द्यावं. ते नाव आणि चिन्ह घेऊनच आमची स्वतंत्र भूमिका आहे."
जे नाव आणि चिन्ह मिळेल ते घेऊन जनतेत जाणार...
प्रशांत जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पक्ष होता. तेच अस्तित्व घेऊन महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. आमचं नाव आणि चिन्ह हे पवार साहेब होतं, आहे आणि उद्याही राहील. त्यामुळे बाकीच्या ज्या चर्चा आहेत. या चर्चांना अर्थ नाही. दुसऱ्या पक्षात विलीन होणं. दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढणे, असा काही विषय नाही. एक-दोन दिवसांत आम्हाला जे नाव आणि चिन्ह मिळेल, ते घेऊनच आम्ही जनतेत जाणार आहोत."
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT