‘तुम्हाला त्याग करावा लागेल..’, BJP आमदारांना देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर भाजप आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी आपल्या सर्व आमदारांची बैठक घेत एक मोठं विधान केलं.
ADVERTISEMENT
मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) अतिशय नाट्यमय पद्धतीने अजित पवार (Ajit Pawar) यांची एंट्री झाल्यापासून शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपमधील (BJP) आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. शिंदे गटातील आमदारांची नाराजी ही स्पष्टपणे समोर आली आहे. मात्र, भाजपच्या आमदारांची नाराजी अद्याप तरी समोर आलेली नाही. मात्र, अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजप आमदारांमध्येही धुसफूस असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (7 जुलै) आपल्या सर्व आमदारांची मुंबईत एक बैठक घेतली. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी आपल्या आमदारांना स्पष्ट शब्दात सांगितलं की, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तुम्हाला त्याग करावा लागेल. (you have to sacrifice for modi devendra fadnavis clearly told bjp mlas ajit pawar shinde fadnavis government maharashtra politics update)
ADVERTISEMENT
पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले:
‘महाविकास आघाडी तुटणं आवश्यक होतं’
‘सध्य राजकीय परिस्थितीत बेरजेचे राजकारण गरजेचं आहे. महाविकास आघाडी तुटणं आपल्यासाठी आवश्यक होतं. त्यांची तीन पक्षांची एकत्रित बेरीज आपल्यासाठी अडचणीची ठरणार होती. त्यामुळे आपल्याला बेरजेचे राजकारण करावे लागले.’ असं देवेंद्र फडणवीसांनी आपल्या आमदारांना सांगत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
‘मोदींना पंतप्रधान बनवायचंय, तुम्ही त्यागाची तयारी ठेवा’
‘मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतील. येत्या काळात त्यागाची तयारी ठेवा, हे यापूर्वीच सांगितलं होतं. येत्या लोकसभा आणि विधानसभेसाठी झोकून देऊन काम करा. येणारा काळ आपलाच असेल याची खात्री देतो.’ असं म्हणत त्यांनी आपल्या नाराज आमदारांना चुचकारण्याचा देखील प्रयत्न यावेळी केला.
हे वाचलं का?
‘विरोधी एकत्र आले तरी फायदा होणार नाही…’
यावेळी देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की, ‘पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा,
मोदी @9 अभियानाला आणखी 10 दिवस मुदतवाढ द्या, ‘संपर्क से समर्थन’ अभियान जोमाने राबवा. पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम खालपर्यंत गेले पाहिजे. तसेच संघटना जोमाने काम करीत असताना लोकप्रतिनिधींना सुद्धा त्याला तितकीच भक्कम साथ द्यावी लागेल. तुमची ताकद एकत्र करावी लागेल. समाजातील विविध स्तरातील लोकांना भेटा. विरोधी कितीही एक आले तरी त्याने फायदा होणार नाही.’ असा सल्लाही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिला.
‘भाजपा पक्ष फोडत नाही, पण…’
‘भाजपा पक्ष फोडत नाही, पण मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुणी येत असेल तर त्यांना सोबत घेण्याला विरोध नाही. मोदींना साथ देण्यासाठी सोबत येणाऱ्यांचे स्वागत करा. मंत्रिमंडळ विस्तारसुद्धा आपण लवकरच करू.’ असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
दरम्यान, असं असलं तरी अजित पवारांच्या एंट्रीने अनेक मतदारसंघातील गणितं ही बिघडणार आहेत. अशावेळी भाजप मतदारसंघातील लोकांना कशा पद्धतीने समजवणार हा मोठा प्रश्न आमदारांसमोर आहे. अशावेळी आता भाजपमधील नाराजी समोर येणार की पक्षशिस्तीच्या नावाखाली ती तशीच दडून राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT