Ganpat Gaikwad : ‘पत्नीचं संरक्षण करू शकत नाही ते…’, अंधारेंची फडणवीसांवर बोचरी टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

sushma andhare criticize devendra fadnavis on ganpat gaikwad firing case and shrikant shinde viral photo maharashtra politics
sushma andhare criticize devendra fadnavis on ganpat gaikwad firing case and shrikant shinde viral photo maharashtra politics
social share
google news

Sushma Andhare Criticize Devendra Fadnavis : ज्ञानेश्वर पाटील, हिंगोली : ‘जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते होते, तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात गुन्हेगारीचा टक्का वाढला आहे’. त्यामुळे ‘जे स्वतः च्या पत्नीला सरक्षण देऊ शकत नाहीत ते महाराष्ट्र काय सुरक्षित ठेवणार आहेत’,अशी खरमरीत टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) केली आहे. (sushma andhare criticize devendra fadnavis on ganpat gaikwad firing case and shrikant shinde viral photo maharashtra politics)

सुषमा अंधारे यांच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ संवाद यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. यानिमित्त हिंगोलीत त्यांनी प्रसिद्दी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. श्रीकांत शिंदे आणि हेमंत दाभेकर यांच्या भेटीच्या व्हायरल फोटोवर देखील अंधारेंनी भाजपावर निशाणा साधलाय.

हे ही वाचा : Rajya Sabha election 2024 : काँग्रेसला निवडणुकीत बसणार धक्का?

श्रीकांत शिदेंच्या व्हायरल फोटोवर काय म्हणाल्या?

शिंदे आणि भाजपाच्या नेत्यांचे गुंडा सोबतचे फोटो व्हायरल होणं त्यात काही विशेष नाही. मागे राणेंची पोर सुद्धा पुण्यातील एका गुंडाच्या घरी गेली होती. या सगळ्या लोकांचे गुंडांसोबत असलेले लागे बांधे आत्ता उघड झाले आहे. त्यामुळं मला असं वाटते कि आम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिले कि गुंड पाळलेत, हेच कळायला मार्ग नाही, असा टोला अंधारेंनी शिंदे गट आणि भाजपला लगावला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गायकवाड प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही

गायकवाड गोळीबार प्रकरणावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, ज्या पद्धतीने दोन गटात वादविवाद सुरु आहे. दोन मित्रात रुसवे फुगवे असणं हे समजू शकतो. मात्र ही धुसफूस गँगवारच्या पातळीवर गेली आहे. आत्ता एकमेकांना अगदी नामशेष करने संपवून टाकणे इथं पर्यंत शिंदे-फडणवीस यांचा वाद पेटलाय. यात आम्ही चौकशीची मागणी केली आहे मात्र असं वाटत नाही कि यात निष्पक्ष चौकशी होईल, असे देखील सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत..

हे ही वाचा : Jitendra Awhad : ‘काकाच्या मृत्यूची वाट बघताय’, अजित पवारांमुळे आव्हाडांचा चढला पारा

ज्या पद्धतीने महाराष्ट्र बिहारच्या दिशेने चालला आहे. कारण बिहारमध्ये भाजपाची सत्ता आहे. याचा अर्थ असा आहे कि, ज्या राज्यात बीजेपीची सत्ता आहे, त्या राज्यात गुंडशाही आणि दहशत टिपेला पोहचली आहे. तसेच जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात येत तेव्हा गुन्हेगारीचा टक्का वाढलाय. हे वारंवार सिद्ध झालं आहे.त्यामुळं नेहमीच देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून नापास ठरल्याची टीका देखील अंधारेंनी फडणवीसांवर केली.

ADVERTISEMENT

फडणवीस यांच्या पत्नी संदर्भात तक्रार झाली की त्यांच्या पत्नी सोबत स्पायगिरी होते आहे. हे त्यांनी स्वतः सभागृहात सांगितलं. त्यामुळे जे स्वतःच्या पत्नीला संरक्षण देऊ शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय संरक्षण देणार, अशी टीका अंधारेंनी फडणवीसांवर केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT