“राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा!” घोषणा देत काळे झेंडे दाखवून पुण्यात निषेध

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने, आज पुण्यात स्वराज्य संघटनेचे धनंजय जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांना काळे झेंडे दाखवित निषेध नोंदवला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर, भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटविण्यात यावे.या मागणीसाठी राज्यातील अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत.त्याच दरम्यान आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुणे दौर्‍यावर आले आहेत.यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे राज्यपालांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या सगळ्या बाबी लक्षात घेऊन, आम्ही राज्यपालांना काळे झेंडे दाखविणार अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जाहीर केली.त्यामुळे राजभवन ते यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी स्थळापर्यन्त पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.मात्र त्याच दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कार्यक्रमाच्या ठिकाणी जात असलेल्या मार्गावर काळे झेंडे दाखवित निषेध नोंदवित. ‘राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत राज्यपालांचा निषेध नोंदविला.त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भगतसिंह कोश्यारी यांनी काय म्हटलं होतं?

“आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारत असत की तुमचा आवडता नेता कोण? कुणी सुभाषचंद्र बोस, कुणी महात्मा गांधी, कुणी पंडित नेहरूंचं नाव घ्यायचं. मला वाटतं आता हा प्रश्न आला की तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे आयकॉन मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातले आहेत. मी आत्ताच्या काळाबाबत बोलतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत अनेक आयकॉन आहेत”

राज्यपालांनी याआधीही एकदा छत्रपती शिवरायांबाबत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

गुरुची महती पटवून देण्याच्या नादात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल आणि समर्थ रामदारांशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा कोण विचारेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता? राज्यपाल भगत सिंह कोश्यारींच्या या वक्तव्यावरूनही चांगलाच वाद निर्माण झाला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT