'ज्या दिवशी बोलेल त्यावेळेस मात्र 8 दिवस हंगामा माजलेला असेल'; तानाजी सावंतांनी कुणाला दिला इशारा ?

तानाजी सावंत यांनी मुंबई Tak शी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे
Tanaji sawant on opponents
Tanaji sawant on opponents

आरोग्यमंत्री तानाजी सावंत आपल्या पुण्यातील घर ते कार्यलय आणि कार्यालय ते घर असं 1 किमीच्या जाहीर दौऱ्यावरून ट्रोल होत आहेत. यावर अखेर तानाजी सावंत यांनी मुंबई Tak शी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जे ट्रोल सुरूय, ते चुकीचं आहे. ट्रोल करणारे लोक काय म्हणतात त्याच्याशी मला काही देणंघेणं नाही. मी जास्त बोलणार नाही, पण ज्यादिवशी बोलेन, त्यावेळेस गदारोळ माजेल,' असा इशारा तानाजी सावंत त्यांनी विरोधकांना दिला आहे.

काय म्हणाले तानाजी सावंत?

पुण्यामध्ये माझा राखीव वेळ होता. मी कुठलीही गाडी मागितली नव्हती. शासकीय ताफ्यांच्या मी विरोधात आहे. माझ्या कॉलेजचं आणि मतदारसंघातील लोकांचं आज दिवसभर काम मी करत होतो. पण राजकीय विरोधकांनी 1 किमीचा दौरा होता, डीव्ही कार पाहिजे असं सांगितलं. माझ्या स्वतःच्या गाड्या आहेत. मी प्रोटेक्शन देखील टाळतो. कारण शासनावरती ताण येऊ नये म्हणून. सध्या जनतेला प्रोटेक्शनची गरज आहे असं तानाजी सावंत म्हणाले.

तानाजी सावंतांचा इशारा!

आता दहा दिवसाचे गणपती येत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ते लोकं मला ट्रोल करत आहेत, हा त्यांचा मागच्या दहा- पंधरा दिवसांपासूनचा कार्यक्रम आहे. पण माझ्या वरिष्ठांनी मला सांगितलं आहे त्यांना प्रतिसाद देऊ नका. काही बोलू नका. त्यांना काय करायचं ते करू द्या. पण ज्या दिवशी बोलेन त्यावेळेस मात्र पुन्हा 8 दिवस हंगामा माजलेला असेल, असा थेट इशाराच तानाजी सावंत यांनी विरोधकांना दिला आहे.

घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर, असा सावंतांचा दौरा व्हायरल

तानाजी सावंत यांचा पुण्यातील कात्रज येथील निवासस्थान ते बालाजी नगर येथील कार्यलय दरम्यान फक्त 5 मिनिटाचा अंतर आहे. दोन दिवस आरोग्यमंत्री घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर इतकाच प्रवास करून दौरा प्रसिद्ध झाला. यामुळे त्यांच्या दौऱ्याची मोठी चर्चा सुरु आहे. विरोधक त्यांचा प्रसिद्ध झालेल्या दौऱ्याची प्रत व्हायरल करत सावंतांना ट्रोल करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in