‘राज्यातील अनैसर्गिक आघाडीला….’ संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका

ADVERTISEMENT

shivsena ubt sanjay raut reaction on ajit pawar and ncps 9 mlas oath ceremony governor ramesh bais
shivsena ubt sanjay raut reaction on ajit pawar and ncps 9 mlas oath ceremony governor ramesh bais
social share
google news

Sanjay raut criticize bjp government : राजकीय अस्थिरता आणून पुन्हा एकदा निवडणूकींना सामोरे जायचे, तणाव निर्माण करायचा आणि तणावांवर मत मागायची, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. कर्नाटक तुमचच राज्य होत, तर दंगली का झाल्या? मणीपुर का पेटलंय? असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला होता. (thackeray group mp sanjay raut criticize bjp government)

त्र्यंबकेश्वर वादावर काय म्हणाले?

राज्यातील अनैसर्गिक आघाडीला भीती वाटतेय जनता स्विकारेल की नाही, म्हणूनच देशभरात धार्मिक तणावाची फॅक्टीरी उघडली असून, या फॅक्टरीची प्रयोगशाळा महाराष्ट्रात असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. तसेच सरकारला माहितीय कोण करतयं?. सरकारचं करत असेल. विरोधी पक्ष का करतील. विरोधी पक्षांना उचलून तूरूगात टाकताय, असे देखील राऊत म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदु, मुसलमान, ख्रिश्चन इतर मागारसवर्गीय गुण्यागोविंदाने नांदायचे.तेव्हा कमालीची शांतता होती, दंगली झाल्या नाहीत, असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

हे ही वाचा : राहुल नार्वेकर म्हणाले, शिवसेनेच्या 16 नाही तर 54 आमदारांवर घेणार निर्णय

अटकपूर्व जामीन मंजूर

संजय राऊत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राऊत यांनी न्यायालयाचे देखील आभार देखील मानले. हे सरकार बेकायदेशीर असून या सरकारचे आदेश पाळू नये अशा प्रकारचं आवाहन केले होते. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात कलम 505/1 (ब) भा.दं.वि. सह कलम पोलिसांप्रती अप्रीतीची भावना चिथावणे (1922 कायदा) यानुसार पोलीसांनी स्वतः फिर्यादी होत गुन्हा दाखल केला होता. नाशिकमध्ये तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी हे विधान केले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा :  लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र होणार?, फडणवीसांचं मोठं विधान

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कुठेही जातीय दंगल झाली नाही. शिंदे फडणवीस सरकार येताच दंगली घडतायत. तुम्ही अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असताना दंगल घडतेय आणि तुम्ही काहीच करू शकत नाही. हे तुमचं अपयश आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.

दरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिर वाद प्रकरणावर 4 ऊरूस आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT