Maratha Reservation : “मोदींच्या खिशात आरक्षणाची चावी, जरांगेंनी…”, ठाकरेंचे दहा सवाल

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Maratha Reservation Row : Uddhav Thackeray Shiv Sena targets Narendra modi devendra fadnavis over Reservatin issue
Maratha Reservation Row : Uddhav Thackeray Shiv Sena targets Narendra modi devendra fadnavis over Reservatin issue
social share
google news

Manoj Jarange Hunger Strike, Maratha Reservation, Saamana Editorial : ’31 डिसेंबरपर्यंत आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय लागेल. म्हणजे सरकार जाणार हे नक्की. मग शिवछत्रपतींची शपथ घेऊन मराठय़ांना आरक्षण देण्याचा विडा मुख्यमंत्र्यांनी उचललाय तो कशाच्या भरवशावर? शिवछत्रपतींची शपथ खोटी ठरवू नये हेच आमचे म्हणणे आहे’, असे म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. (Shiv sena UBT Raised ten questions about maratha reservation)

मराठा आरक्षण मुद्द्यावर भाष्य करताना ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटलं आहे की, “सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत देऊन मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घेतले. जरांगे यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यांनी पाणीही सोडले होते. त्यांच्या प्रकृतीविषयी सगळय़ांनाच घोर लागून राहिला होता, पण जरांगे यांनी हट्टाने उपोषण सुरू ठेवले. ते सर्वपक्षीय नेत्यांच्या विनवणीनंतर मागे घेतले. उपोषण मागे घेतले हे खरे, पण आरक्षणाचा ‘पेच’ कायम आहे”, असं भाष्य सामना अग्रलेखातून करण्यात आलं आहे.

“मराठा आंदोलनामुळे राज्य जवळजवळ ठप्पच झाले. या घडामोडी सुरू असताना राज्य वाऱ्यावर टाकून गृहमंत्री असलेले उपमुख्यमंत्री फडणवीस हे केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी दिल्लीत गेले. राज्यातील अराजकापेक्षा फडणवीस यांना निवडणूक समितीची बैठक महत्त्वाची वाटते, हे दुःखद आहे. जरांगे यांचे उपोषण साधारण नाही”, असा इशारा शिवसेनेने (यूबीटी) भाजपला दिला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जरांगेंनी दिल्लीत जावं…

“जरांगे-पाटील यांनी सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण सोडले, पण ही आश्वासने हवेतली ठरू नयेत. सरकारने शब्द पाळला नाही तर मुंबईचे नाक बंद करू, असा इशारा जरांगेंनी दिला. मुंबईचे नाक बंद करणे हे ठीक आहे. पण मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी आता दिल्लीला धडक दिली पाहिजे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची चावी पंतप्रधान मोदींच्या खिशात आहे व मोदी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत”, असं म्हणत शिवसेनेने (यूबीटी) जरांगेंना दिल्लीत जाऊन आंदोलन करण्याचा सल्ला दिला आहे.

हे ही वाचा >> Eknath Shinde: ‘जरांगेंची सरसकट आरक्षणाची मागणी नाही’, CM शिंदेंच्या विधानाने मोठा संभ्रम

“जरांगे-पाटलांनी आता उपोषण मागे घेतले. पण त्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले. राज्यातील बेकायदा सरकारने ज्या पद्धतीने हा प्रश्न चिघळवत नेला त्यातून हे प्रश्न उपस्थित झाले आहेत”, असे म्हणत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दहा सवाल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना केले आहे.

ADVERTISEMENT

मराठा आरक्षण : शिवसेनेचे (यूबीटी) दहा सवाल

1) शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मिंधे सरकार नेहमीच म्हणत आले की, आमच्या मागे महाशक्ती आहे. ही महाशक्ती महाराष्ट्र पेटला असताना झोपली होती काय?

ADVERTISEMENT

2) देवेंद्र फडणवीस निवडणूक समितीच्या बैठकीसाठी दिल्लीस गेले. तेथे नरेंद्र मोदी व अमित शहा होते. फडणवीस यांनी जरांगे-पाटलांचे उपोषण व महाराष्ट्राच्या स्थितीवर पंतप्रधानांशी चर्चा केली काय?

3) भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या सामाजिक समरसतेला चूड लावायची आहे काय? मराठा समाज विरुद्ध ‘ओबीसी’ असा झगडा त्यांना पेटवायचा आहे काय?

4) सर्वपक्षीय बैठकीनंतर फडणवीस म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा. सगळे ठीक होईल.’ याचा अर्थ काय? मराठा आरक्षणापासून फडणवीस स्वतःला लांब का ठेवत आहेत?

हे ही वाचा >> Maratha Reservation: ‘या’ घडीची मोठी बातमी… मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, घेतला मोठा निर्णय

5) मनोज जरांगे-पाटील हा फाटका फकीर माणूस असून त्याच्या रक्तात स्वार्थ नाही. त्यामुळे दबाव व खोक्यांनी तो विकत घेता येणार नाही. हीच सरकारची समस्या आहे काय?

6) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावून घटनादुरुस्ती करणे गरजेचे आहे. विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अद्यापि का केली नाही? व आता तरी ते विशेष अधिवेशन घेतील काय?

7) मनोज जरांगे-पाटील यांना दिल्लीत नेऊन पंतप्रधानांशी चर्चा का घडवली गेली नाही?

8) गुजरातमधील ‘पटेल’ आंदोलनाप्रमाणे महाराष्ट्रातील ‘मराठा’ आंदोलन चिरडून टाकायची योजना आहे काय?

9) शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीच्या सीमेवर वर्षभर लांबवले, तसे मराठ्यांचे आंदोलन सरकारला लांबवत ठेवायचे राजकारण आहे काय?

10) सरकारला जरांगे-पाटलांचे नेतृत्त्व संपवून त्यांचा अण्णा हजारे करायचा आहे काय?

हे ही वाचा >> ’11 मुख्यमंत्र्यानी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत गोल-गोल फिरवलं’

“या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राला हवी आहेत. थातूरमातूर बैठका व चर्चा यातून मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागणार नाही. मराठा आरक्षणाचा पेच हा महाराष्ट्राच्या गळ्याला लागलेला फास आहे. एरवी महाराष्ट्राच्या राजकारणात हस्तक्षेप करणारे भाजपचे दिल्लीश्वर आता पळ काढीत आहेत”, असं म्हणत सामना अग्रलेखातून मोदी-शाहांवर टीकास्त्र डागण्यात आलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT