महाराष्ट्रातही ‘खेला होबे’! गोवा ते बिहार… आतापर्यंत कुठे कुठे झालंय ‘ऑपरेशन लोटस’?
एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडखोरीनं महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याच्या शक्यता बळावल्या आहेत. शिवसेनेतील आमदारांचा एक मोठा गट सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी खिंडारच पाडलं आहे. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसोबत भाजपचे नेते वारंवार दिसत आहेत. विशेषतः भाजप शासित राज्यांमध्येच शिवसेनेच्या बंडखोर गटाची व्यवस्था करण्यात आलीये. त्यामुळे या सगळ्या राजकीय घडामोडींमागे भाजपच असल्याचं सांगितलं […]
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडखोरीनं महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याच्या शक्यता बळावल्या आहेत. शिवसेनेतील आमदारांचा एक मोठा गट सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी खिंडारच पाडलं आहे. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसोबत भाजपचे नेते वारंवार दिसत आहेत. विशेषतः भाजप शासित राज्यांमध्येच शिवसेनेच्या बंडखोर गटाची व्यवस्था करण्यात आलीये. त्यामुळे या सगळ्या राजकीय घडामोडींमागे भाजपच असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणेच आता ऑपरेशन लोटस (Operation Lotus) महाराष्ट्रात होणार का हे बघावं लागणार आहे.
मोदी सरकारला सत्तेमध्ये येऊन आठ वर्ष पुर्ण झाले आहेत. यादरम्यान भाजप अनेक राज्यात बॅकफुटवर राहिली तर काही राज्यात भाजपने विरोधी पक्षाचे आमदार आपल्याकडे वळवून घेतले. मध्य प्रदेशपासून कर्नाटकपर्यंत तर अरुणाचल प्रदेशपासून बिहारपर्यंत अनेक राज्यात भाजपने सत्तांतरं घडवून आणली आहेत.
अरुणाचल प्रदेश
2016 मध्ये अरुणाचल प्रदेशात भाजपने सरकार स्थापन केले. त्यावेळी विधानसभेत पक्षाचे 60 पैकी केवळ 11 आमदार होते, पण तरीही त्या राज्यातील काँग्रेसचे सरकार पाडण्यात भाजपला यश आले. वास्तविक, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलच्या 33 आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला होता.
या सर्वांनी पेमा खांडू यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी 44 जागांचा आकडा गाठला. अशा परिस्थितीत अरुणाचल प्रदेशात पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने पूर्ण बहुमताने राज्यात आपले सरकार स्थापन केले.