आता मशालीची धग सहन करा! : बाळासाहेबांनी भाजपला ३७ वर्षांपूर्वीच दिला होता इशारा
एकनाथ शिंदेंनी पक्षावर दावा ठोकला आणि आता शिवसेनेचे दोन गट पडले. एक ठाकरेंचा गट म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दुसरा शिंदेचा गट म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना. ठाकरेंना मशाल हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. आयुष्याच्या पुन्हा पेटवा मशाली असं आवाहनही शिवसैनिकांना केलं जातं आहे. पण, अशातच बाळासाहेब ठाकरेंनी काढलेलं ३७ वर्ष जुनं व्यंगचित्र व्हायरल होतं आहे. […]
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंनी पक्षावर दावा ठोकला आणि आता शिवसेनेचे दोन गट पडले. एक ठाकरेंचा गट म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दुसरा शिंदेचा गट म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना. ठाकरेंना मशाल हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. आयुष्याच्या पुन्हा पेटवा मशाली असं आवाहनही शिवसैनिकांना केलं जातं आहे.
पण, अशातच बाळासाहेब ठाकरेंनी काढलेलं ३७ वर्ष जुनं व्यंगचित्र व्हायरल होतं आहे. यामध्ये मशाल हाती धरून बाळासाहेब भाजपला इशारा देताना दिसतात. आता भाजप आणि सेनेमध्ये आताचा वाद तर आपल्याला नवीन नाही. पण, त्यावेळी असं काय झालं होतं की बाळासाहेबांनी इतक्या कठोर शब्दात भाजपला इशारा दिला होता? मशाल हातात धरून बाळासाहेबांनी भाजपला काय म्हटलं होतं? हे पाहणं गरजेचं आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी हे व्यंगचित्र शेअर केलं. त्यानंतर ते व्हायरलंही झालं. या व्यंगचित्रात एका बाजूला शिवसेना कमळ हातात घेतलेली दिसते, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना हातात मशाल घेऊन दिसते. कमळ हातात घेतलं तेव्हा सुखावलात, आता मशालीची धग सहन करा, असा इशारा बाळासाहेब या व्यंगचित्रातून भाजपला देताना दिसतात. आम्ही अधिक माहिती घेतली असता, बाळासाहेबांनी हे व्यंगचित्र १९८५ मध्ये काढलं होतं. पण, बाळासाहेब १९८५ मध्ये भाजपविरोधात इतके आक्रमक का झाले होते?
हे वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी १९८४/८५ मध्ये काढलेले बोलके व्यंगचित्र… #मशाल@OfficeofUT @AUThackeray pic.twitter.com/gmkxuAsWYm
— Arvind Sawant (@AGSawant) October 10, 2022
तर त्याचं झालं असं, १९८४ ला भाजप आणि सेनेची पहिल्यांदा युती झाली. त्यावेळी शिवसेनेकडे त्यांचं अधिकृत असं चिन्हं नव्हतं. त्यामुळे बाळासाहेबांनी त्यांचे दोन उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर उतरवले होते. एक होते मनोहर जोशी आणि दुसरे वामनराव महाडीक. पण, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसला मिळालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे या भगव्या युतीचा टीकाव लागला नाही आणि युतीचे उमेदवार मोठ्या फरकानं पराभूत झाले. त्यानंतर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी शिवसेनेसोबत युती नको, असा निर्णय घेतला. शेवटी भाजप-सेनेची युती तुटली.