“भाजपचा नवा सनातन धर्म, मोदी-शाह चिअर्स करणार का?”, शिवसेनेचा (UBT) थेट सवाल
uddhav thackeray pm modi : हरीश साळवे यांच्या लग्नात ललित मोदी हजर होते. त्यावरून आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना घेरले आहे.
ADVERTISEMENT

Lalit modi in harish salve’s Wedding : ‘ललित मोदीस कुणाचे संरक्षण लाभले आहे, हे साळवेंच्या तिसऱ्या लग्नाने उघड केले. तिसऱ्या लग्नाची ही गोष्ट रंजक आहे. देशाचा व्हिलन त्या लग्नात दिसल्यामुळे भाजपची पुरती नाचक्की झाली, पण निर्लज्जम् सदासुखी! भाजपचा मुखवटा हा असा रोजच गळून पडतो आहे’, अशा शब्दात शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपला घेरलं आहे.
ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरिश साळवे यांनी तिसऱ्यांदा लग्न केलं. या विवाह सोहळ्यास फरार घोषित करण्यात आलेला ललित मोदी होता. यावरून शिवसेनेने भाजपला कात्रीत पकडलंय.
सामना अग्रलेखातून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्ला चढवला आहे. शिवसेनेने म्हटलं आहे की, एक देश एक निवडणूक या धुळफेकीसाठी मोदी-शाहांच्या सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्या समितीत प्रख्यात कायदेपंडित हरीश साळवे यांची खास नियुक्ती करण्यात आली आहे.’
हेही वाचा >> Maratha Morcha : ‘माझी अंत्ययात्रा तरी निघेल नाहीतर मराठा समाजाला…’, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
शिवसेनेने (युबीटी) पुढे म्हटले आहे की, ‘एकतर साळवे हे मोदी यांचे चाहते आहेत, दुसरे म्हणजे साळवे यांना कायद्याचे ज्ञान व अनुभव प्रचंड आहे आणि मोदी सरकारला ते कायदेशीर गोष्टींत मदत करीत असतात. मोदी अडचणीत आले की, साळवे हे काळा डगला चढवून मोदींची बाजू मांडतात. महाराष्ट्रात भाजपने जे ‘घटनाबाह्य’ सरकार निर्माण केले व त्यास मोदी-शाहांचे आशीर्वाद लाभले. या प्रकरणात साळवे घटनाबाह्य सरकारची बाजू हिरिरीने मांडत आहेत.’










