नितीन गडकरींचं चॅलेंज भाजपच्या खासदारानं पूर्ण केलं; बदल्यात मिळाले २३०० कोटी रुपये!

आणखी २९ हजार ७०० कोटी रुपये मिळणं बाकी
Nitin Gadkari
Nitin GadkariMumbai tak

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या वेगवेगळ्या आव्हानात्मक कामांसाठी ओळखले जातात. ते स्वतः आव्हान ते पूर्ण करण्यावर विश्वास ठेवतात. यातूनच अनेकदा ते अशक्यप्राय गोष्टीही शक्य असल्याच बोलून दाखवितात. मात्र नुकतेच नितीन गडकरी यांनी एका भाजपच्या खासदाराला आव्हान होतं. इतकचं नाही तर ते आव्हान पूर्ण केल्यानंतर त्या बदल्यात आता या खासदार महोदयांना तब्बल २३०० कोटी रुपये मिळाले आहेत.

नेमकं काय आहे हे प्रकरण?

नितीन गडकरी यांनी मध्यप्रदेशमधील उज्जैनचे भाजप खासदार अनिल फिरोजीया यांना फेब्रुवारीमध्ये वजन कमी करण्याचं आव्हान दिलं होतं. या जोडीला आव्हान पूर्ण केल्यास जेवढं किलो वजन कमी करालं, त्याच्या प्रति किलो एक हजार कोटी रुपये विकास निधी मतदारसंघाला देईन, असं आश्वासन गडकरी यांनी दिलं होतं. त्यावेळी फिरोजीया यांचं वजन १३० किलोंच्या घरात होतं. त्यामुळे त्यांना चालनही अवघड जायचं. अनेकदा चालताना त्यांना दम लागायचा.

त्यानंतर अनिल फिरोजीया यांनीही गडकरी यांचं हे आव्हान स्वीकारलं. फिरोजीया यांनी आपल्या वजनावर प्रचंड मेहनत घेण्यास सुरुवात केली. त्यांनी व्यायाम आणि आहारातील सातत्य राखलं. त्यामुळे जून महिन्यापर्यंत त्यांचं १५ किलो वजन कमी केलं होतं. पण त्यानंतरही ते थांबले नाही. आजअखेर त्यांचं ३२ किलोंनी वजन कमी झालं. सध्या त्यांचं वजन 98 किलो आहे.

यानंतर गडकरींनी आपला दिलेला शब्द खरा करुन दाखवला. गडकरी यांनी अनिल फिरोजीया यांच्या उज्जैन लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत २३०० कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिली. यात उज्जैनमध्ये फोलरेल हायवे आणि रोपवे प्रकल्पलांचा समावेश आहे. मात्र राहिलेला निधीही देण्याच आश्वासन गडकरी यांनी दिले आहे. 11 ऑक्योबर रोजी उज्जैनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनिल फिरोजीया यांनी वजन कमी करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचं कौतुक केलं होतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in