फॉक्सकॉन-वेदांताचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यामागे मोदी सरकार?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भविष्यातील औद्योगिक विकासात आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रोजेक्ट गुजरात गेल्याची माहिती समोर आली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटले. हा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची सर्व प्रक्रिया झाली होती, असं ठाकरे सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेल्या सुभाष देसाईंनी म्हटलं आहे. यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं असून, हा प्रकल्प गुजरातमध्ये जाण्यामागे दिल्लीतील मोदी सरकार असल्याचं विरोधकांकडून म्हटलं जातंय.

फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रोजेक्ट गुजरातमध्ये होणार

फॉक्सकॉन आणि वेदांता समुहाकडून भारतात उभारण्यात येणारा सेमीकंडक्टर चिप निर्मिती आणि डिस्प्ले फॅब उत्पादन प्रकल्प महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात तळेगाव येथे उभारण्याचे निश्चित झाले होते. मात्र, हा प्रोजेक्ट आता गुजरातमधील अहमदाबाद येथे उभारला जाणार आहे.

फॉक्सकॉन-वेदांता प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यामागे मोदी सरकार?

महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला आणि तशी घोषणा झालेला फॉक्सकॉन कंपनीचा सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर याला राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला जबाबदार धरलं जात आहे. त्याचबरोबर हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यामागे मोदी सरकार असल्याचं आता विरोधकांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पावणे दोन लाख कोटींचा प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला? ‘खऱ्या’ मुख्यमंत्र्यांनी सांगावं- आदित्य ठाकरे

मोदी सरकार जबाबदार; माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई काय म्हणाले?

“एखादा उद्योग येतो. एखादा उद्योग येत नाही, इथंपर्यंत ठिक आहे, पण हा उद्योग महाराष्ट्राच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा होता. या उद्योगामुळे इतर उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाली असती. त्यांच्या अनुषंगानं अनेक कंपन्यांची साखळी तयार झाली असती. सेमीकंडक्टर निर्मिती ज्याची आज जगाला गरज आहे. महाराष्ट्राने यात मोठं योगदान दिलं असतं. असे किती उद्योग केंद्र सरकार… कारण मोठ्या गुंतवणुकीच्या बाबतीत केंद्राचा शब्द महत्त्वाचा ठरतो. तिथे केंद्र सरकार समर्थ असल्यामुळे किती उद्योग महाराष्ट्रातून गुजरातकडे जातील, हे बघत राहण्याची पाळी महाराष्ट्रावर आलीये का असा प्रश्न निर्माण होतो”, असं सुभाष देसाई म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

सुभाष देसाई यांनी थेटपणे मोदी सरकारला जबाबदार धरलं नसलं, तरी त्यांच्या एकूण विधानाचा अर्थ मात्र मोदी सरकारच्या भूमिकेमुळे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा असाच निघतोय.

ADVERTISEMENT

Foxconn Semiconductor plant : महाराष्ट्राचा 1.54 लाख कोटींचा मोठा प्रोजेक्ट गुजरातला पळवला

मोदींच्या स्वप्नासाठी प्रोजेक्ट गुजरातला नेला?; काँग्रेसनं काय म्हटलंय?

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही फॉक्सकॉन-वेदांता सेमीकंडक्टर प्रोजेक्ट गुजरातला गेल्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. “हा शिंदे फडणवीस सरकारने महाराष्ट्राचा केलेला विश्वासघात आहे. फॉक्सकॉन 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2015 मध्ये जाहीर केले होते. मविआने ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. सरकार बदलले आणि महिन्याभरातच प्रकल्प गुजरातमध्ये गेला. असेच IFSC काढून घेण्यात आले व गुजरातला फायदा झाला. IFSC मुळे गुजरातला गतवर्षी सर्वाधिक FDI मिळाले (एप्रिल ते मार्च 2020-21 हार्डवेअर श्रेणीतील देशातील 78%) ही गुंतवणूक अन्यथा महाराष्ट्रात असती. मोदीजींच्या गुजरात नं १च्या स्वप्नपूर्तीसाठी भाजप नेते महाराष्ट्राला कमकुवत करत आहेत”, अशी भूमिका काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मांडलीये. सावंत यांनीही मोदींच्या नावाचा उल्लेख करत यामागे मोदी सरकार असल्याचं अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे.

“चर्चा झाली फॉक्सकॉनने महाराष्ट्रात प्रोजेक्ट करण्याची घोषणा केली”

सुभाष देसाई या प्रोजेक्टबद्दल बोलताना म्हणाले, “वेदांता आणि फॉक्सकॉन गुंतवणुकीचा विषय तीन वर्षांपूर्वीही चर्चेत आला होता. त्यावेळी फॉक्सकॉनचे त्या काळातील अध्यक्ष टेरी गॉन हे स्वतः महाराष्ट्रात आले होते. काही दिवस मुंबईत थांबले होते. त्यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या होत्या. महाराष्ट्रात हा उद्योग आणत आहोत, अशी घोषणा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. त्यानंतर सगळं थंड झालं होतं. खूप प्रयत्न झाले, संपर्क झाला नाही. नंतर गेल्या वर्षभरात त्याला चालना मिळाली. आम्ही जेव्हा दावोसला गेलो होतो, तेव्हा मी आणि आदित्य ठाकरे यांनी त्याठिकाणी वेदांताचे जे प्रमुख आहेत, अनिल अगरवाल यांच्याशी दीर्घ चर्चा केली होती. अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की, माझं समाधान झालं आहे. हा उद्योग आम्हाला भारतात आणायचा तर आम्ही महाराष्ट्रातच आणू आणि पुढे हे नेतोय असं ते म्हणाले होते.”

महाराष्ट्रातून गुजरातला नेलेला सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रोजेक्ट काय? तो का महत्त्वाचा आहे?

“तीन महिन्यांपूर्वी दिल्लीत फॉक्सकॉनचे अध्यक्ष तैवानवरून आले होते. त्यांनी महाराष्ट्रासाठी म्हणून वेळ दिली होती. मी (सुभाष देसाई), उद्योग सचिव, प्रधान सचिव, एमआयडीसीचे सीईओ असे आम्ही सर्वजण गेलो होतो. तेव्हा त्यांच्याशी तपशीलवार चर्चा केली होती. कोणकोणत्या सवलती, सुविधा दिल्या जातील, याची चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी तळेगाव (पुणे) प्रकल्प उभारणीसाठी निश्चित केलं होतं. त्या सगळ्या सकारात्मक चर्चेनंतर कागदपत्रांवर सह्या करायच्या इतकंच काम राहिलेलं होतं. दरम्यान, आमचं सरकार गेलं. त्यामुळे आमचे प्रयत्न थांबले. कालपरवा आपण फोटो बघितले की, मुख्यमंत्र्यांची (एकनाथ शिंदे) त्यांनी भेट घेतली आणि असं असताना अचानकपणे हा मोठा धक्का महाराष्ट्राला बसला आहे”, असं म्हणत देसाईंनी शिंदे-फडणवीस सरकारला यासाठी जबाबदार धरलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT