शशी थरुर यांनी उडवली काश्मीर फाईल्सची खिल्ली, विवेक अग्नीहोत्री म्हणाले.....

शशी थरूर आणि विवेक अग्नीहोत्री यांच्यात रंगलं ट्विटर वॉर
शशी थरुर यांनी उडवली काश्मीर फाईल्सची खिल्ली, विवेक अग्नीहोत्री म्हणाले.....
Vivek Agnihotri and Shashi Tharoor argue over The Kashmir Files ban in Singapore

काश्मीर फाईल्स (The Kashmir files) हा सिनेमा रिलिज झाला तेव्हापासून तो वादात आहे आणि चर्चेतही आहे. हा सिनेमा कसा चुकीचा आहे? हे सांगणारा एक वर्ग आहे आणि हाच सिनेमा कसा योग्य आहे हे सांगणाराही एक वर्ग आहे. दोहोंचे वाद आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. अशात या सिनेमावरून होणारे वाद काही थांबताना दिसत नाहीत. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)आणि काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्यात या सिनेमावरून जुंपली.

Vivek Agnihotri and Shashi Tharoor argue over The Kashmir Files ban in Singapore
राष्ट्रवादीला जास्त निधी, द काश्मीर फाईल्स ते तुकारामांचा अभंग; अजित पवारांचं भाजपवर शरसंधान

काय म्हणाले शशी थरूर?

काश्मीर फाईल्स हा सिनेमा सिंगापूरमध्ये (Singapore) बॅन (The Kashmir files ban) करण्यात आला. त्याची बातमी आली. सिंगापूरमध्ये हा सिनेमा बॅन करण्यात आला कारण या सिनेमात मुस्लिमांची एकच बाजू दाखवण्यात आली आहे. तसंच हा सिनेमा भडक आहे असंही सांगण्यात आलं. सिंगापूरचं चॅनल न्यूज एशियाने दिलेला एक लेख ट्विट करत शशी थरूर यांनी ट्विट केला आणि त्यावर ते म्हणाले की भारतात सत्ताधारी पक्षाने प्रमोट केलेला सिनेमा काश्मीर फाईल्स सिंगापूरमध्ये त्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यांनी भाजपवर यावरून टीका केली.

विवेक अग्नीहोत्री यांनी दिलं उत्तर

यानंतर काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी शशी थरूर यांना उत्तर दिलं आहे. ते म्हणतात प्रिय fopdoodle (मूर्ख), gnashnab (नेहमी तक्रार करणारे) सिंगापूरचं सेन्सॉर जगातलं सर्वात मागास सेन्सॉर आहे. त्यांनी तर The Last Temptations of Jesus लाही बॅन केलं. तसंच एक प्रेमकथेवर आधारीत असलेली फिल्म The Leela Hotel Files ला बॅन केलं. त्यामुळे तुम्ही आता काश्मिरी पंडितांच्या ज्या हत्या झाल्या त्याची खिल्ली उडवणं बंद करा.

विवेक अग्निहोत्री दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणतात...

विवेक अग्नीहोत्री म्हणतात हे खरं आहे का की सुनंदा पुष्कर काश्मिरी पंडित होत्या? मी या ट्विट सोबत अटॅच केलेला स्क्रिन शॉट खरा आहे का? तसं असेल तर हिंदू रिती रिवाजांनुसार एखाद्या मृत व्यक्तीला सन्मान देण्यासाठी तरी किमान तुम्ही केलेले ट्विट डिलिट करायला पाहिजेत. तसंच त्यांच्या आत्म्याकडे माफी मागितली पाहिजे. सुनंदा पुष्कर यांनी आपण काश्मिरी हिंदू असल्याचं म्हटलं होतं तोच स्क्रिन शॉट विवेक अग्नीहोत्री यांनी शेअर केला आहे आणि शशी थरूर यांना माफी मागण्यास सांगितलं आहे.

आपल्या ट्विटसोबत विवेक अग्नीहोत्री यांनी सिंगापूरने बॅन केलेल्या ४८ सिनेमांची यादीही जोडली आहे. यामध्ये काही सिनेमांना तर IMDb ने ८ चं रेटिंग दिलं आहे. विवेक अग्नीहोत्री यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचाही हवाला दिला आहे.

आता शशी थरूर विवेक अग्नीहोत्री यांच्या या ट्विटवर काही उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. द काश्मीर फाइल्स या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड तोडले होते. या सिनेमात काश्मिरी पंडितांवर झालेले अन्याय, त्यांचा नरसंहार या सगळ्यावर भाष्य करण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.