Exclusive : मशालधारी ठाकरेंची पुढची खेळी काय? काय म्हणाले आदित्य ठाकरे?
निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं गेलं आहे. मशाल हे चिन्ह शिवसेनेचं जुनं चिन्ह होतं. त्यावर छगन भुजबळ १९८६ मध्ये निवडूनही आले होते. आता उद्धव ठाकरे हे कसं राजकारण कुठल्या दिशेने जाणार आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी याबाबत उत्तर दिलं आहे. लढाई अजून बाकी आहे आमची लढाई अजून […]
ADVERTISEMENT

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं गेलं आहे. मशाल हे चिन्ह शिवसेनेचं जुनं चिन्ह होतं. त्यावर छगन भुजबळ १९८६ मध्ये निवडूनही आले होते. आता उद्धव ठाकरे हे कसं राजकारण कुठल्या दिशेने जाणार आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी याबाबत उत्तर दिलं आहे.
लढाई अजून बाकी आहे
आमची लढाई अजून बाकी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आम्हाला मिळालं आहे कारण उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे ही नावं शिवसेनेपासून वेगळी करता येणारच नाहीत. दुसऱ्या गटाला जे नाव मिळालं त्यात बाळासाहेब हे नाव आहे. पण बाळासाहेब कुठले? कारण बाळासाहेब अनेक नेत्यांना म्हटलं जातं. हिंदूहृदय सम्राट यांचा आशीर्वाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावातच आला आहे. गेल्या अडीच वर्षात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उत्तम काम केलं. आम्हाला धगधगती मशाल मिळाली आहे. आधीही आमचा विजय झाला होता आताही विजय झाला. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरही मशाल आहे. ती मशाल आणि आमची मशाल सारखी आहे.
मशाल हे चिन्ह विजयाचं प्रतीक
हा जो राजकारणातला अंधःकार झाला आहे त्यात आम्ही मशाल या आमच्या चिन्हामुळे प्रकाश टाकणार आहोत असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. बहुमत आमच्या बाजूने असं सांगत आहेत. बंड आणि उठाव करायला ताकद लागले. हे सगळे गद्दार पळून गेले. आधी सुरतला मग गुवाहाटीला गेले. ४० गद्दारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं का जात नाही? पडद्यामागे राहून शिवसेना संपवण्याचे, ठाकरे कुटुंब संपवण्याचे प्रयत्न सुरू आहे. लोकांना ही सगळी बाब कळली आहे.
इतका नीच आणि निर्ल्लज प्रकार कुणी केला नव्हता
ज्या धनुष्यबाणाचं बाळासाहेब ठाकरेंनी पूजन केलं होतं. हा धनुष्यबाण गोठवण्याचं पाप या गद्दारांनी केलं आहे. राजकारणात सगळा गोंधळ उडाला आहे. अत्यंत नीच आणि निर्ल्लज प्रकार या गद्दारांनी केला आहे. देशात अशा प्रकारचं राजकारण होणं हे राज्याच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीन घातक आहे.