Viral Video मुळे चर्चेत आलेल्या शीतल म्हात्रे कोण आहेत?

मुंबई तक

Sheetal Mhatre controversy : मुंबई : शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्याशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. मात्र हा व्हिडीओ मॉर्फ करुन व्हायरल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसंच ठाकरे गटाच्या (uddhav Thackeray faction) आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनीच हा व्हिडीओ व्हायरल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Sheetal Mhatre controversy :

मुंबई : शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्याशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. मात्र हा व्हिडीओ मॉर्फ करुन व्हायरल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसंच ठाकरे गटाच्या (uddhav Thackeray faction) आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनीच हा व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप म्हात्रेंनी केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve) यांचे पुत्र राज सुर्वे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यापूर्वीही अनेकदा शीतल म्हात्रे चर्चेत आल्या आहेत. पण सातत्याने चर्चेत असणाऱ्या या शीतल म्हात्रे या नेमक्या आहेत कोण असा सवाल विचारला जात आहे. (Who is Shiv Sena Leader Sheetal Mhate? Why Sheetal Mhatre is in controversy)

कोण आहेत शीतल म्हात्रे?

शीतल म्हात्रेंकडे मुंबई शिवसेनेतील आक्रमक चेहरा म्हणून पाहिलं जातं. राजकीय कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी म्हात्रेंनी महिला पत्रकार म्हणून काम केलं आहे. त्यानंतर १३ वर्षांपूर्वी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. सुरुवातील शिवसेनेच्या पदाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांना नगरसेवकपदाची उमेदवारी मिळाली.

पहिल्यांदा नगरसेवक :

२०१२ साली शीतल म्हात्रे पहिल्यांदा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्या. पुढे २०१७ सालीही म्हात्रे यांनी पुन्हा एकदा नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली. उत्तर मुंबईच्या दहिसर वॉर्ड नंबर ८ मधून त्यांनी दोन्हीवेळा नगरसेवकपदाची निवडणूक लढवली आणि जिंकली देखील.

हे वाचलं का?

    follow whatsapp