शिवसेनेचं निवडणूक चिन्ह कुणाला मिळणार? शरद पवारांची प्रतिक्रिया समोर, म्हणाले...

जाणून घ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत काय म्हटलं आहे?
Who will Get Shivsena Election Symbol Bow and Arrow Sharad Pawar Gave Answer Says
Who will Get Shivsena Election Symbol Bow and Arrow Sharad Pawar Gave Answer Says

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरूद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातला पक्षाचा आणि निवडणूक चिन्हाचा वाद हा आता थेट निवडणूक आयोगाच्या दारात गेला आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षावर आणि निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर दावा सांगितला आहे. धनुष्यबाण हा आम्हालाच मिळावा ठाकरे गटाकडून अंधेरीच्या पोटनिवडणुकीत त्याचा गैरवापर होऊ शकतो असं शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दिलेल्या अर्जात म्हटलं आहे. या सगळया वादाबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Who will Get Shivsena Election Symbol Bow and Arrow Sharad Pawar Gave Answer Says
"धनुष्यबाण आम्हालाच मिळेल याची खात्री" गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

काय म्हटलं आहे शरद पवार यांनी?

"शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोग निकाल देईल. मला याबाबत काहीही सांगायचं नाही. निवडणूक आयोग जो निकाल देईल. निवडणूक आयोगाचा निकाल कुठल्याही राजकीय पक्षाला मान्य करावाच लागतो." असं म्हणत शरद पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. तिथे आल्यानंतर शरद पवार यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.

नाशिकच्या बस अपघाताबाबत काय म्हणाले शरद पवार?

"मी सकाळीच त्या दुर्घटनेची माहिती घेतली हा अपघात दुर्दैवी आहे, राज्य सरकारच्या वतीने त्याची चौकशी होत आहे त्या चौकशीनंतर त्याची कारणे कळतील, आत्ता जे जखमी झालेले प्रवासी आहेत त्या लोकांना लवकरात लवकर वैद्यकीय मदत कशी देता येईल ही राज्य सरकारची यंत्रणा बघते आहे, ज्यांचा मृत्यू झाला ही अत्यंत दुखद अशी घटना आहे त्यांच्या कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसलाय आपण सगळे त्यांच्या दुःखात सहभागी आहे."

आज सरसंघचालक मोहन भागवत यांनीही एक वक्तव्य केलं आहे. त्यात त्यांनी वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था या सगळ्या भूतकाळ आहेत आपण त्या विसरून जायला हव्यात असं म्हटलं आहे. याबाबतही शरद पवारांनी भाष्य केलं आहे.

काय म्हटलं आहे शरद पवारांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्याबाबत?

मोहन भागवतांचं वक्तव्य माझ्याही वाचण्यात आलं. समाजामध्ये एका मोठ्या वर्गाला काही पिढ्या या यातना सहन कराव्या लागल्या ते यातनाच्या संबंधित जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्या घटकांना याची जाण व्हायला लागली. हा बदल योग्य बदल आहे, नुसतं माफी मागून चालणार नाही आपण व्यवहारांमध्ये या सर्व घटकांची भूमिका या सर्व गोष्टी अवलंबून आहेत असं म्हणत शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in