शिंदे गटाला मनसेमध्ये सामील करुन घेणार? राज ठाकरेंनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आपल्यासोबत शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन बंड केले. अगोदर सुरत नंतर गुवाहटी असा प्रवास करुन ते १२ दिवसानंतर महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात विशेष अधिवेशन होऊन नवीन सरकार स्थापन झाले. या संपूर्ण घडामोडींवर राज ठाकरेंचे प्रतिक्रिया समोर आली आहे. झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे.

शिंदे गटाला मनसेमध्ये सामील करुन घेणार?

राज्यातील सध्याचे सरकार हे कायदेशीर प्रक्रियेमध्ये अडकले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला वेगळी मान्यता मिळाली नाही तर ते मनसेमध्ये जाण्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. त्यावर आता राज ठाकरेंनी उत्तर दिले आहे. ”बाहेर पडलेले सर्व माझे जुने सहकारी आहेत, मी त्यांच्यासोबत पुर्वी काम केलेले आहे. आणि हा सर्व टेक्नीकल भाग आहे. परंतु उद्या जर त्यांच्याकडून काही प्रस्ताव आला तर त्याबाबत नक्की विचार करेन असे राज ठाकरे म्हणाले आहे.

Raj Thackeray: ”बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या जवळचे ‘बडवे’ सारखेच, मीही त्याचमुळे बाहेर पडलो”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आताचे आमदार फुटण्याचे कारण तेच…राज ठाकरे

दरम्यान आपल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी इतर गोष्टींवर देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले ”राज्यातील सध्याची परिस्थिती आणि मी बाहेर पडलो त्यावेळची परिस्थिती सारखीच होती. त्या वेळची कारण आणि आताचे आमदार फुटण्याचे कारण तेच आहे. ही कारणं मी त्यावेळेला बाळासाहेबांना सांगितली होती” परंतु काही फरक पडला नाही असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

बाळासाहेब असते तर हे होणं शक्य नव्हतं- राज ठाकरे

आता बाळासाहेब असे तर सध्याची परिस्थिती ओढावली असती का? यावर राज ठाकरे स्पष्ट बोलले आहेत. राज म्हणाले बाळासाहेब ठाकरे असते तर हे होणं शक्य नव्हतं, कारण शिवसेना एक पक्ष किंवा संघटना म्हणून बघू नका, ती एका विचारानं बांधली गेलेली माणसं होती. बाळासाहेब होते तोपर्यंत तो विचार होता त्यामुळे बाळासाहेब असते तर हे शक्यच नव्हतं असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

राज ठाकरेंनी या मुलाखतीमध्ये बाकी विषयांवरही भाष्य केले आहे. राज ठाकरेंवरती नेहमी एक टीका होते ती म्हणजे राज ठाकरे एखादे आंदोलन मध्येच सोडून देतात. त्यावर राज ठाकरे म्हणाले माझं एकतरी आंदोलन दाखवा जे मी मध्येच सोडले आहे. टोलचे आंदोलन, तसेच मराठी पाट्यांचा विषय, मोबाईल ऐकू येणारी मराठी भाषा, पाकिस्तानी कलाकारांना बंदी हे सर्व आम्ही केले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT