big bash league : गोलंदाजांनी घडवला इतिहास, अवघ्या 15 धावात संपूर्ण संघ गारद!
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीग टी20 क्रिकेट स्पर्धेत इतिहास घडला. बिश बॅग लीगमध्ये सिडनी थंडर्ससाठी आजचा दिवस मानहानीकारक पराभवाचा ठरला. BBL मध्ये झालेल्या सामन्यात एडिलेट स्ट्रायकर्सच्या गोलंदाजांनी अक्षरशः गोलंदाजाचा धुरळा उडवला. एडिलेट स्ट्रायकर्सच्या भेदक गोलंदाजीसमोर सिडनी थंडर्सचा संपूर्ण संघ 15 धावात तंब्बूत परतला. टी20 क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या ठरली. बिग बॅश लीग […]
ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीग टी20 क्रिकेट स्पर्धेत इतिहास घडला. बिश बॅग लीगमध्ये सिडनी थंडर्ससाठी आजचा दिवस मानहानीकारक पराभवाचा ठरला. BBL मध्ये झालेल्या सामन्यात एडिलेट स्ट्रायकर्सच्या गोलंदाजांनी अक्षरशः गोलंदाजाचा धुरळा उडवला. एडिलेट स्ट्रायकर्सच्या भेदक गोलंदाजीसमोर सिडनी थंडर्सचा संपूर्ण संघ 15 धावात तंब्बूत परतला. टी20 क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या ठरली.
बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात क्रिकेट रसिकांना अविश्वसनीय सामना बघायला मिळाला. बिग बॅश लीग च्या पाचव्या सामन्यात आज एडिलेट स्ट्रायकर्सच्या गोलंदाजांनी कमाल केली. सिडनी थंडर्स आणि एडिलेट स्ट्रायकर्स यांच्यात सामना झाला.
सिडनीतील मैदानावर झालेल्या या सामन्यात एडिलेट स्ट्रायकर्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना एडिलेट स्ट्रायकर्सने 9 गडी गमावत 139 धावा केल्या.
15… 15!!! We're still in shock.
Watch every Thunder wicket below #BBL12
— cricket.com.au (@cricketcomau) December 16, 2022