एमएस धोनीने चुकवला सगळ्यांचाच अंदाज! आयपीएल निवृत्ती नाही, तर केली वेगळीच घोषणा
भारताचा यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने रविवारी आपण लाईव्ह येऊन महत्वाची माहिती देणार असल्याचं घोषित केलं होतं. धोनी प्रत्येक फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो, असे अनेक चाहत्यांना वाटत होतं. पण तसं काही घडले नाही. अशाप्रकारे या 41 वर्षीय दिग्गज खेळाडूच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. खरंतर धोनीने ओरियो बिस्किट भारतात लाँच केले आहे. धोनीला 2022 […]
ADVERTISEMENT

भारताचा यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने रविवारी आपण लाईव्ह येऊन महत्वाची माहिती देणार असल्याचं घोषित केलं होतं. धोनी प्रत्येक फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो, असे अनेक चाहत्यांना वाटत होतं. पण तसं काही घडले नाही. अशाप्रकारे या 41 वर्षीय दिग्गज खेळाडूच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. खरंतर धोनीने ओरियो बिस्किट भारतात लाँच केले आहे. धोनीला 2022 च्या T20 विश्वचषकाशीही त्याचा संबंध जोडला आहे.
धोनीने शनिवारी त्याच्या फेसबुक अकाऊंटवर एक माहिती दिली की, तो 25 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता एक रोमांचक बातमी शेअर करण्यासाठी लाईव्ह येईल. त्यामुळे अनेकांना उत्सुकता लागली होती. धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेऊ शकतो, अशा देखील चर्चा होऊ लागल्या होत्या. मात्र धोनीने येऊन वेगळीच माहिती दिली.
धोनी लाईव्ह आला आणि म्हणाला
एमएस धोनी लाइव्ह येऊन म्हणाला, ओरियो यावेळी आम्हाला वर्ल्डकप जिंकूवू शकतो. २०११ मध्ये भारताने विश्वचषक जिंकण्यापूर्वी ओरिओ लॉन्च करण्यात आला होता. जर ओरिओ पुन्हा लॉन्च झाला तर यावर्षी भारत चषक जिंकेल. आता कनेक्शन साफ झाले आहे. चला Oreo पुन्हा लाँच करू. भारतात प्रथमच Oreo सादर करत आहे. मी पुन्हा 2011 परत आणत आहे. इतिहास घडवण्यासाठी आणि त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी तुम्हीही पुढे यावे, असं धोनी म्हणाला.