गांगुलीला त्या बद्दल बोलायची काहीच गरज नव्हती! Kohli सोबतच्या वादावर दिलीप वेंगसरकरांचं परखड मत

मुंबई तक

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निघण्याआधी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठं वादळ निर्माण झालं होतं. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने विराटच्या कॅप्टन्सीवरुन केलेल्या वक्तव्यावरुन मोठा संभ्रम निर्माण झाला होता. कालांतराने हा वाद शांत होतोय असं वाटत असतानाच भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी आपलं परखड मत मांडत गांगुलीच्या भूमिकेवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निघण्याआधी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठं वादळ निर्माण झालं होतं. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने विराटच्या कॅप्टन्सीवरुन केलेल्या वक्तव्यावरुन मोठा संभ्रम निर्माण झाला होता. कालांतराने हा वाद शांत होतोय असं वाटत असतानाच भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी आपलं परखड मत मांडत गांगुलीच्या भूमिकेवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

“माझ्या मते निवड समितीकडून सौरव गांगुलीला बोलायची काहीच गरज नव्हती. गांगुली हा बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. संघातील निवड किंवा कॅप्टन्सीबद्दल जो काही वाद असेल त्याबद्दल निवड समितीच्या अध्यक्षांनी बोलायला हवं होतं. हे सर्व प्रकरण बीसीसीआयला अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आलं असतं.” वेंगसरकर Khaleej Times ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

IPL 2022 Mega Auction : आगामी हंगामासाठी BCCI सज्ज, बंगळुरुत ‘या’ तारखेला लिलाव रंगणार?

गांगुलीने त्या प्रकरणाबद्दल सर्वच काही सांगून टाकलं, त्यामुळे साहजिकच विराटला त्याची बाजू स्पष्ट मांडणं गरजेचं होतं. माझ्या मते ही बाब फक्त कर्णधार आणि निवड समितीच्या अध्यक्षांमध्ये रहायला हवी होती. कर्णधाराला निवडणं किंवा त्याला पदावरुन हटवणं हे निवड समितीचं काम आहे, हे काम गांगुलीचं नाही अशा परखड शब्दांत वेंगसरकरांनी आपली भूमिका मांडली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp